शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या वाढत्या प्रभावाने सुकामेव्याचा बाजार बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:15 IST

नाशिक : वाढत्या थंडीत मेथीचे लाडू, खारीक-खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू अशा पौष्टिक खुराकासाठी सुकामेव्याच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेतील सुकामेवा विक्रेत्यांकडे ...

नाशिक : वाढत्या थंडीत मेथीचे लाडू, खारीक-खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू अशा पौष्टिक खुराकासाठी सुकामेव्याच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेतील सुकामेवा विक्रेत्यांकडे महिलांची गर्दी वाढू लागली आहे.

यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुकामेवा महागला असला तरी कोरोनाच्या काळात तंदुरुस्तीला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. स्मरणशक्ती तल्लख रहावी म्हणून सकाळी सकाळी बदाम खाणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेक घरांमध्ये रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम, सुकामेवा खायला देतात. कोरोनाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने सुकामेव्याचा खप आधीच वाढलेला होता. त्यानंतर सणासुदीच्या काळात काजू आणि बदामचे दर वाढत असतानाही खप सुरूच होता. त्यामुळे सुकामेव्याच्या मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. देशाच्या बाजारात बदामाची आवक अमेरिका व इराणमधून होत आहे. बदामला चीनमधून मोठी मागणी असते. मात्र, सध्या दोन्ही देशांतून चीनला निर्यात बंद आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा बदामाचा हंगाम हा नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात असतो. तसेच भारतात निर्यात वाढली आहे. त्यामुळे आयात निर्यातीच्या बदलत्या समीकरणांमुळे दरात काहीशी घट आली आहे. दरम्यान, गोवा, केरळ, तसेच मंगळुरू येथून काजूची आवक होत आहे. बेदाण्याची आवक नाशिक जिल्ह्यासह सांगलीतून होत आहे. इराण आणि अमेरिकेतून पिस्त्याची आवक होते. काश्मीरमधून अक्रोडची आवक होत आहे. तसेच भारतात यंदा अक्रोडचे उत्पन्न कमी झाल्याने चिली आणि कॅलिफोर्निया या देशांतूनदेखील अक्रोड आयात होत आहे .

इन्फो

सध्याचे सुकामेव्याचे किरकोळ दर (प्रतिकिलो)

बदाम -६५०, काजू ८५०, तुकडा काजू ५००, खजूर १५०, साधी खारीक २५०, काळी खारीक ३००, खोबरे २०० ,बेदाणा २८०, अक्रोड १२५०, अंजीर १०५०, पिस्ता १२५०, खसखस १५००, जर्दाळू ६५०, चारोळी १२५०, गोडांबी ७५०

इन्फो

बदामाचे दर कमी

गतवर्षीच्या तुलनेत बदामाचे दर यंदा शंभर रुपयांनी कमी आहेत, तर काजूचे दर स्थिर आहेत. बाजारात सर्व प्रकारच्या सुकामेव्याला चांगली मागणी आहे.

बाबूभाई पटेल, वाराही ट्रेडिंग