शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ सजली

By admin | Updated: August 27, 2016 23:53 IST

वेध गणरायांचे : गणेशमूर्तींना मोतीकलेचा साज

नाशिक : लाल बागचा राजा, टिटवाळ्याचा गणपती, पुणेरी पगडीतील गणपती, बाल गणेश, बाजीराव गणपती, अशा अनेकविध गणेशमूर्तींनी शहराची बाजारपेठ सजली आहे.गणेशोत्सोवाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले असून गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. डोंगरे वसतीगृह मैदान, इदगाह मैदानावर गणेशमूर्ती विक्रीचे गाळे लावण्यात आले आहे. शहरातील मेनरोड, कॉलेजरोड, द्वारका, सिडको परिसरात ठिकठिकाणी गणेशमूर्र्ती विकणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावर्षी बाजीराव-मस्तानी चित्रपटातील बाजीराव रूपातील गणेशमूर्तीचे आकर्षण दिसून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.बाप्पांचे आगमन अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपले असून, शहरात गेल्या महिनाभरापासून गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक कारखान्यांसह पेण, अहमदनगर आदि भागांतून गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहरातील गणेशभक्तांनी आतापासूनच आपल्या आवडीची गणेशमूर्ती आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहारातील ग्राहकांप्रमाणेच घोटी, इगतपुरी, जळगाव आदि भागांतून गणेशभक्तांनी गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यावर्षी नेहमीच्या मूर्तीपेक्षा ‘डायमंड वर्क’ केलेल्या मूर्तीलादेखील गणेशभक्तांकडून विशेष मागणी होऊ लागली आहे. विविध रंगांतील खडे, बाजूबंद, मुकुट, सोंडपट्टी आदि आभूषणांची आकर्षक सजावट गणेशमूर्तीवर करण्यात आली आहे. घरगुती गणपती मूर्तीसह सार्वजनिक मंडळासाठी लागणाऱ्या मोठ्या आकारातील गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. रेखीव डोळे, मूर्तीवरील इतर कोरीव काम असलेल्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा विशेष कल दिसून येतो. गणपतीमूर्तीप्रमाणे सजावटीचे साहित्यांची दुकाने सजली आहेत. थर्माेकोलचे मखर, विविध फुले- वेली, इंद्रधनुष्य, असे विविध प्रकार विक्रीसाठी दाखल झाले आहे.