शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सजावट साहित्याने बहरली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीने वेग घेतला असून ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. तसेच बाजारात लहान-मोठ्या श्री गणरायाच्या मूर्ती, आरास, देखावे व शोभिवंत वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले आहे.

नाशिकरोड : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीने वेग घेतला असून ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. तसेच बाजारात लहान-मोठ्या श्री गणरायाच्या मूर्ती, आरास, देखावे व शोभिवंत वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले आहे. अवघ्या पाच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सर्वत्र बाजारपेठ सजली आहे. सार्वजनिक मंडळाकडून आपआपल्या ठिकाणी मंडप उभारणीचे काम हाती घेतली असून देखावा-आरास येत्या दोन-तीन दिवसांत उभारणीला प्रारंभ होईल, असे चित्र दिसत आहे.मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून वर्गणीचे नियोजन, पूजेसाठी श्री गणपतीची मूर्ती ठरविणे, कार्यकारिणी फलक, विद्युत रोषणाई, कमान उभारणे आदी कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. काही मंडळे आपल्याकडील जुना देखावा विकण्यासाठी व नवीन देखावा घेण्यासाठी ठिकठिकाणी संपर्क करत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या दरवर्षी कमी होत असल्याने नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची धमाल कमी होत असल्याचे चित्र आहे. यंदा एक-दोन मंडळे तांत्रिक अडचणीमुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळांना ‘आॅनलाइन’ परवानगीसाठी अर्ज करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी, जागा मालकाची परवानगी आदि पद्धतीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.बिटको चौकात गणेशमूर्तींचे स्टॉल्सगणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी लहान-मोठ्या सुबक श्री गणरायाच्या मूर्तीचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. तसेच रंगीबेरंगी थर्माकॉलचे मंदिर, आरास, प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईच्या माळा आदी शोभिवंत वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने बाजारपेठ सजली आहे. श्री गणपतीची विविध प्रकारची गिते असलेली सीडीदेखील विक्रीसाठी आल्या आहेत. घराघरांमध्ये श्री गणरायाची आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता केली जात असून कार्यशाळेत शाडूमातीपासून बनविलेल्या गणपतीची स्थापना करणार आहे. घरामध्ये देखावा-आरासदेखील काही ठिकाणी साकारली जात आहे. तसेच सोसायटी, कॉलनी, व्यावसायिक संकुल आदी ठिकाणी असलेल्या छोट्या प्रमाणातील गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे.