शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

दहा टक्के आवक: किरकोळ शेतमाल विक्रीबंद, महिला हमालांना नो एन्ट्री पंचवटी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात ...

दहा टक्के आवक: किरकोळ शेतमाल विक्रीबंद, महिला हमालांना नो एन्ट्री

पंचवटी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने बारा दिवस कठोर निर्बंध लादले होते. सोमवारी निर्बंध शिथील झाल्याने बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले. तब्बल बारा दिवसांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाल्यानंतर सकाळी

शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणला होता. कोरोना नियमांचे पालन करून बाजार समितीत शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात होता.

बाजार समित्यांमधील व्यवहाराला परवानगी देण्यात आली असली तरी कोरेाना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी बाजार समित्यांवर असल्याने त्यानुसार सकाळपासून प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात आला. बाजार समितीत केवळ शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात होता, तर शेतमाल आणणाऱ्या चालकाचा वाहन परवाना बघून सोडले जात होते. बाजार समितीच्या अन्य घटकांना पास बघून प्रवेश दिला जात होता. महिला हमालांना नो एन्ट्री होती.

आज बाजार समिती सुरू झाल्यानंतर साधारणपणे दहा टक्के शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणला होता.

सोमवारी महिला हमालांना बंदी केल्याने महिला हमालांनी प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षक व बाजार समिती कर्मचाऱ्यांशी

वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारावर पोलीस तैनात करण्यात आल्याने महिला हमालांना प्रवेश मिळाला नाही. लिलावाच्या वेळी व्यापारी तसेच शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे काही प्रमाणात उल्लंघन झाले. युवक हमालांनी गर्दी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

बाजार समितीत किरकोळ विक्रेते तसेच भरेकऱ्यांनादेखील प्रवेश

नाकारल्याने त्यांनी बाजार समितीत प्रवेश नाकारलेल्या किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडून शेतमाल खरेदी केला. बाजार समितीत प्रवेश नाकारल्याने अनेक किरकोळ शेतकरीवर्गाने कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर असलेल्या दिंडोरीरोडवर मिळेल त्या ठिकाणी शेतमालाची विक्री केली. बाजार समितीबाहेर शेतकरी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोराेना नियम पायदळी तुडविल्याचे चित्र दिसून आले. बाजार समितीत एरवी सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी

होते. मात्र, सोमवारी बाजार समिती सुरू झाल्यानंतर सेल हॉल

आवारात काहीसा शुकशुकाट बघायला मिळाला.

इन्फो बॉक्स

...तर जागेवर अँटिजन चाचणी

शेतकऱ्यांची कोरोना चाचणी करून त्यांना बाजार समितीत प्रवेश दयावा, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांच्या चाचणीसाठी अँटिजन किट उपलब्ध करून दिले, तर बाजार समिती डॉक्टर तसेच आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून तत्काळ प्रवेशद्वारावर अँटिजन चाचणी करून त्यानुसार शेतकऱ्यांना प्रवेश देईल.

महापालिका प्रशासनाने अँटिजन किट उपलब्ध करून दयावे, यासाठी बाजार समिती पत्रव्यवहार करणार आहे.