शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू; आरोप

By admin | Updated: October 20, 2015 00:04 IST

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू; आरोप

घोटी : येथील एका डॉक्टरने विवाहित महिलेवर प्रसूतीदरम्यान उपचार करण्यास हलगर्जीपणा केल्याने विवाहितेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत विवाहितेच्या नातलगांनी घोटी पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.इगतपुरी तालुक्यातील आडवन येथील माहेर असलेली सुनीता पुनाजी सराई ही विवाहिता बाळांतपणासाठी माहेरी आली होती. तिला प्रसूतीसाठी आई वडिलांनी घोटी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने सुलभ प्रसूती होणार नसल्याचे सांगत सदर महिलेला तब्बल चौदा दिवस रुग्णालयात ठेवले. दि. १७ रोजी महिलेची सुखरूप प्रसूत्ती झाल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. यामुळे तिला घोटीतीलच दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथेही प्रकृती गंभीर झाल्याने तिला नाशिकला खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. तरीही नाशिक येथील रुग्णालयाने तिला अतिदक्षता विभाग दाखल करून घेऊन बिल अदा केल्यानंतर मृत घोषित केले. दरम्यान, या महिलेच्या मृत्यूनंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचे सीझर झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत मृत विवाहितेचा पती पुनाजी मंगा सराई याने घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे.दरम्यान, उपचार करताना डॉक्टराने हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप नातलगांनी केला असून, केवळ बिलाच्या हव्यासापोटी चौदा दिवस रुग्णालयात दाखल केल्याने तिचा मृत्यू झाला. या मृत्यूस संबंधित डॉक्टरासर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना काशीनाथ मेंगाळ यांच्यासह कावजी ठाकरे, काशीनाथ वारघडे, देवराम भस्मे, लहानू हिंदोळे, कमळू कडाळी, संजय लोते आदिच्या शिष्टमंडळाने दिले. (वार्ताहर)