शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात झेंडूची शेती बहरली...

By admin | Updated: September 13, 2014 21:25 IST

कळवण तालुक्यात झेंडूची शेती बहरली...

कळवण : नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबर नवनिर्मितीचा ध्यास घेऊन तालुक्यात झेंडूची शेती केल्याने झेंडूची शेती बहरली आहे. अनेक शेतकरी आता झेंडू शेतीकडे वळले आहेत.उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या यात्रोत्सवात देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात, या परिसरातील आदिवासी बांधव यात्राकाळाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची लागवड करतात, मात्र फुलांची मागणी अधिक असल्याने शिर्डी व अन्य शहरातून झेंडूची आयात केली जात ेहोती. कालांतराने तालुक्यातीलच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडूचे उत्पादन करण्यास सुरुवात केल्याने सप्तशृंग गडाबरोबरच राज्यातल्या अन्य ठिकाणीही झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात तसेच दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. मुंबईत दादर येथे तर गुजरातमधल्या अहमदाबाद येथेही झेंडूला मोठी बाजारपेठ असून, तालुक्यातील बहुसंख्य झेंडू उत्पादक शेतकरी आपला माल या ठिकाणी विक्रीस नेत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो असलेला भाव नवरात्रोत्सव व दिवाळीच्या काळात ९० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.कळवण तालुक्यात आजमितीस निवाणे, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, दह्याणे, आठंबे, पाळे पिंपरी आदि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली जात आहे. योग्य नियोजन व योग्य भाव हे झेंडू फूलशेतीच्या लागवडीचे गमक असून, झेंडू लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षापासून झेंडू शेतीविषयी कृषी विभागाकडून मार्गदर्शन व सल्ला मिळत असल्याने झेंडू शेतीकडे कल वाढला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. लागवड केल्याच्या ४५ दिवसांनंतर झेंडू फुले निघण्यास सुरुवात होते. झेंडूची लागवड लाभदायी असून, त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे झेंडू उत्पादक शेतकरी बांधवांनी सांगितले.