शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मॅरेथॉन पुतळ्याचे अनावरण

By admin | Updated: June 23, 2016 23:16 IST

आॅलिम्पिक दिन : कविता राऊत, दत्तू भोकनळ यांना रॅलीतून दिल्या शुभेच्छा

 नाशिक : जागतिक आॅलिम्पिक दिनानिमित्त गंगापूररोड येथे मविप्रतर्फे रन तसेच मॅरेथॉन चौक येथे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या रनमध्ये मविप्र संस्थेतील खेळाडू तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा सहभाग होता.गंगापूररोड येथील मॅरेथॉन चौक ते व्ही. एन. नाईक महाविद्यालयमार्गे पुन्हा मॅरेथॉन चौक असा मार्ग या रनसाठी निश्चित करण्यात आला होता. या एक किमी अंतरावरील रनमध्ये नाशिक जिल्हा स्केटिंग, रोर्इंग, अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, कॅनोर्इंग, हॅण्डबॉल, आर्चरी आदि खेळांतील खेळाडूंचा सहभाग होता. यावेळी आॅलिम्पिक दिनानिमित्त ‘घोषवाक्य’ स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होरायझन अकॅडमी (प्रथम), न्यू मराठा हायस्कूल (द्वितीय), जनता विद्यालय, गांधीनगर (तृतीय) यांनी बाजी मारली.दरम्यान, यावेळी मॅरेथॉन पुतळ्याचे अनावरण तसेच रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धावपटू कविता राऊत आणि रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी आॅलिम्पिक स्पर्धेत यश संपादन करावे यासाठी त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच गंगापूररोड येथे अशा शुभेच्छांचे फलकदेखील लावण्यात आले होते. खेळाडूंचा उत्साह वाढावा तसेच जिल्ह्यातून अधिकाधिक क्रीडापटू घडावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. या आॅलिम्पिक रॅलीदरम्यान आॅलिम्पिक गीत धून तसेच स्फू र्ती गीते लावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पोलीस उपायुक्त विजय पाटील, नगरसेवक विक्रांत मते, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, अ‍ॅड. नितीन ठाकरे, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे यांच्यासह संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)