शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मराठी वैभव सांगणारी भाषा! किशोर पाठक : मुक्त विद्यापीठातर्फे विशाखा, श्रमसेवा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:52 IST

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे.

ठळक मुद्देसुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्कार

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे. त्यामुळे मराठी माणसानेही मराठीच्या वैभवाचेच गुणगान करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे गंगापूररोड परिसरातील एका मंगल कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात विद्यापीठाच्या वतीने नाशिकच्या सुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा तर मुंबई येथील दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु ई. वायुनंदन, कुलसचिव दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नवोदित कवी ठाण्याचे सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहासाठी प्रथम, सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना ‘एठन’ काव्यसंग्रहासाठी द्वितीय व सांगलीच्या सुनीता बोर्डे-खडसे यांना तृतीय क्रमांकाचा विशाखा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी किशोर पाठक म्हणाले, कवीने एकट्याने नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाइलमुळे माणूस अस्वस्थ झाला असला तरी मराठी माणसाने सोशल माध्यमांचा मराठीच्या विकासासाठी वापर करण्याचे आवाहनही किशोर पाठक यांनी यावेळी केले. यावेळी ई. वायुनंदन यांनी प्रत्येकाला मातृभाषेविषयी प्रेम व जिव्हाळा वाटत असला तरी मराठीतील गोडवा सर्वांनाच आकर्षित करणारा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिनेश भोंडे यांनी केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर आणि आभार विजया पाटील यांनी मानले.बेदखल शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्तमहानगरच्या संवेदना आपल्या कवितांतून समाजातून मांडल्या. बेदखल झालेल्या शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्त केले. आज मुक्त विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार मिळत असल्याने विशाखाशी नाते जोडले गेल्याचे मनोगत यावेळी विशाखा पुरस्काराचे प्रथम मानकरी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मानवैदू या अतिशय मागासलेल्या, दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मान मुक्त विद्यापीठाने केला आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. विद्यापीठाने केलेल्या सन्मानाने मला समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवता येतील, अशा भावना रुक्मिणी पुरस्कार विजेत्या दुर्गा गुडिलू यांनी व्यक्त केल्या.