नाशिक : लोकमत समूहातर्फे आयोजित आणि राजुरी स्टील प्रस्तुत ‘नाशिक प्रीमिअर लीग’ अर्थात एनपीएल ही क्रिकेट स्पर्धेतील आठव्या सामन्यात एसव्हीसी रॉयल्स या संघाला नमवून मराठा वॉरियर्सने निसटता विजय मिळविला. मराठा वॉरियर्सतर्फे २० षटकांत ८ बाद १६१ धावा केल्या, तर एसव्हीसी रॉयल्सतर्फे २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या. मराठा वॉरियर्सतर्फे फलंदाजी करताना स्वप्नील राठोड याने (१३), कपिल शिरसाठ (१४) यांनी मोठी धावसंख्या केली नसली तरी तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गौतम रघुवंशी याने ३१ चेंडूत ३ षटकार व २ चौकार मारून २० षटकांत ८ बाद १६१ धावा केल्या. या कामगिरीमुळे तो सामनावीर ठरला. त्याला राजुरी स्टीलतर्फे ५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. हर्षद मेर याने २४ चेंडूत ३ षटकार व १ चौकार मारून झटपट ४२ धावा केल्या. त्याला जेम्स अॅन्थनी पारितोषिक म्हणून ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.एसव्हीसी रॉयल्सतर्फे गोलंदाजी करताना गौरव काळे याने ४ षटकांत ३० धावा देत ४ गडी बाद केले. कुणाल कोठावदे, शरद सूर्यवंशी, वैभव केंदळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एसव्हीसी रॉयल्सतर्फे फलंदाजी करताना आरिफ खान याने ३५ चेंडूत ३० धावा केल्या. यात त्याने ४ चौकार मारले. धावा काढण्याच्या नादात तो धावचित झाला. नीलेश चव्हाण याने १७ चेंडूत २७ धावा करताना ४ चौकार मारले. कुणाल कोठावदे याने ११ धावा केल्या. वैभव केंदळे याने ३३ चेंडूत ६२, तर इरफान मन्सुरी याने १३ धावा काढून ते नाबाद राहिले. मराठा वॉरियर्सतर्फे फलंदाजी करताना दर्शन सोनवणे याने ४ षटकांत २९ धावा देत २ महत्त्वाचे खेळाडू बाद केले. या कामगिरीबद्दल संघमालक शैलेश कुटे यांनी त्याला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले. गौतम रघुवंशी, आशिष वाघमारे, मनोज परमार, यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.नािशक प्रीमिअर लीग या स्पर्धेतील सामना बघण्यासाठी ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील, एसव्हीसी बॅँकेचे संचालक दिलीप शशीतल व सचिव शक्तील कुबल, सहायक महाव्यवस्थापक राजेंद्र राणे, विभागीय व्यवस्थापक संदीप नाडकर्णी, कॅनरा सारस्वत असोसिएशनचे सचिव शिवशंकर मुरडेश्वर, आनंद नाडकर्णी, किशोर सुरकुंद, आर्किटेक्ट क्रिश्ना शिराळी, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह एस. बी. देशमुख, संजय पाटील, नाशिक जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव कुटे व प्रशांत भाबड उपस्थित होते.
एसव्हीसीला नमवून मराठा वॉरिअर्स विजयी
By admin | Updated: December 25, 2014 23:28 IST