शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आंदोलक रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:48 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि़२५) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिकरोडला आठ-दहा दुकाने व बँकेच्या एटीएमची तोडफोड, गंगापूर धरणावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जलसमाधी, विविध ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रस्त्यावर पेटते टायर फेकून आंदोलन करण्यात आले़

नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि़२५) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिकरोडला आठ-दहा दुकाने व बँकेच्या एटीएमची तोडफोड, गंगापूर धरणावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जलसमाधी, विविध ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रस्त्यावर पेटते टायर फेकून आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले तर बहुतांशी शाळांनी सुट्या दिल्या होत्या़ त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, सायंकाळी आंदोलन स्थगित केल्याचे समन्वय समितीच्या वतीने घोषित करण्यात आले़  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे़ या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी नाशिक बंदचे आवाहन करण्यात आले होते़ सकाळपासूनच शहरात शांततेत सुरूवात झाली असली तरी अनेक ठिकाणी बाजारपेठा काही प्रमाणात सुरू होत्या. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी दुकाने बंदचे आवाहन केल्यानंतर बाजारपेठा आणि व्यापारी संकुले बंद करण्यात आली. नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांच्या निषधार्थ घोषणाबाजी करून रॅली काढल्याने रेल्वेस्थानक व सुभाषरोडवरील दुकानदारांनी दुकाने बंद केली होती़शहरात एकूण २४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईशहर परिसरात आंदोलन करणाऱ्या एकूण २४ जणांवर पोलिसांनी प्र्रतिबंधात्मक कारवाई करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. गंगापूर धरणावर आंदोलन करणाºया ९ जणांना ताब्यात घेण्यात आले तर नाशिकरोडला उग्र आंदोलन करणाºया १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.दोन हजार पोलिसांचा बंदोबस्तशहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता़ ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणीही केली जात होती़ शहरातील शालिमार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, रामकुंड, गाडगे महाराज पूल, कन्नमवार पूल, जुने नाशिक या परिसरात विशेष दक्षता घेण्यात आली होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा