शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढताच मका उत्पादकांनी फिरवली खरेदी केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:05 IST

आधारभूत किमतीत मका विक्री करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका पडून असल्यामुळे राज्य सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असली तरी, खुल्या बाजारात अचानक मक्याचे भाव वाढल्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाºयांच्या दारात मका आणून टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.

नाशिक : आधारभूत किमतीत मका विक्री करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका पडून असल्यामुळे राज्य सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असली तरी, खुल्या बाजारात अचानक मक्याचे भाव वाढल्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाºयांच्या दारात मका आणून टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.नाशिक जिल्ह्यात ५४९२ शेतकºयांनी आधारभूत किमतीत मका विक्री करण्यासाठी शासनाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारात व्यापाºयांकडून कमी दरात मका खरेदी करून अडवणूक केली जात असल्यामुळे शासनाने यंदा १७०० रुपये क्विंटल असा दर दिला आहे. डिसेंबरअखेर जेमतेम आठशे शेतकºयांचा मका आजवर खरेदी केंद्रावर आला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांकडील मका खरेदीसाठी दहा ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मध्यंतरी खुल्या बाजारात मक्याचे भाव अचानक दीडशे रुपयांनी वाढल्यामुळे शेतकºयांनी खरेदी केंद्राऐवजी व्यापाºयांना मक्याची विक्री केली, परंतु आवक वाढल्यामुळे पुन्हा मक्याचे भाव खाली आल्याने शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धाव घेतली.डिसेंबरअखेर जिल्ह्णात जवळपास पन्नास हजार क्विंटल मका शिल्लक असण्याच्या शक्यतेने शासनाने १५ जानेवारीपर्यंत मका खरेदीला मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्णातील दहाही केंद्रांवर ही खरेदी होत असताना व्यापाºयांनी पुन्हा खुल्या बाजारात मक्याला १७८० रुपये दर जाहीर केल्याने शेतकºयांनी व्यापाºयांकडे धाव घेण्यास सुरुवात केली असून, गेल्या चार दिवसांपासून फक्त सिन्नर, मालेगाव, देवळा व लासलगाव या चारच केंद्रांवर शेतकºयांनी मका विक्रीसाठी आणला आहे.अन्य केंद्रांवर मात्र मक्याची खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शासनाने वाढवून दिलेली मुदत संपुष्टात येण्यास अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या काळात किती उत्पादक मका विक्रीसाठी केंद्रावर आणतात याकडे मार्केट फेडरेशनचे लक्ष लागले आहे.सतरा रुपयांचा मका एक रुपयातकेंद्र सरकारच्या सहाय्याने राज्य सरकार आधारभूत किमतीत यंदा १७०० रुपये क्विंटल दराने शेतकºयांकडून मक्याची खरेदी करीत असून, तोच मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना एक रुपया किलोप्रमाणे वाटप केला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील १४५० रुपये दराने खरेदी केलेला मका रुपयाच्या भावातच विकावा लागला होता. शिवाय मक्याची विक्री करणाºया रेशन दुकानदारास मात्र किलोमागे दीड रुपया कमिशन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा मक्याच्या उत्पादनात घट झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांनी केंद्र सरकारकडून परदेशातून मका आयात करण्याची परवानगी मागितली आहे, ते पाहता देशी मका एक रुपया किलोप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना जबरदस्तीने वाटप केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती