शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ठिकाणी बंडखोरी शक्य

By admin | Updated: October 8, 2016 01:10 IST

पूर्व प्रभाग : निकुळे अडचणीत; सर्वसाधारण जागांवर वाढणार चुरस

संजय शहाणे इंदिरानगरमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागरचनेत इंदिरानगर ते पाथर्डी फाटा पर्यंत अनेक प्रभागांची मोडतोड करण्यात आली असून त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. मनसेचे विद्यमान नगरसेवक यशवंत निकुळे यांना निवडणूक अडचणीची ठरली असून दोन नव्या प्रभागांत अनेक विद्यमान नगरसेवक आमनेसामने येण्याची शक्यता आहे, तर काही प्रभागांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.महापालिकेचा सध्याचा प्रभाग क्रमांक ४० व ३८ मिळून नवीन प्रभाग क्रमांक २३ प्रस्तावित झाला आहे. यात लाकेसंख्या ५१,१९१ इतकी लोकसंख्या आहे. यात विद्यमान मनसे नगरसेवक यशवंत निकुळे व डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा प्रभाग असलेल्या भारतनगर, श्रीरामनगर, विनयनगर, कमोदनगर आणि इंदिरानगरचा समावेश आहे. तसेच सतीश कुलकर्णी व नीलिमा आमले यांचा हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, खोडेनगर, गणेश बाबानगर आणि डीजीपीनगरचा भाग जोडला गेला आहे. त्यात चार जागांपैकी अनुसूचित जमाती आणि ओबीसी अशा दोन जागा महिलांसाठी राखीव असून, दोन सर्वसाधारण जागा खुल्या आहेत. यापूर्वी अनुसूचित जमाती या राखीव प्रभागातून निवडून आलेले यशवंत निकुळे यांना आता खुल्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.सध्याचे ५३, ५४ व ३० हे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभाग क्रमांक ३० झाला आहे. त्याची लोकसंख्या ४७,७६३ आहे. यात विद्यमान नगरसेवक सतीश सोनवणे आणि अर्चना जाधव यांच्या प्रभागातील राजीवनगर, वैभव कॉलनी, किशोरनगर, पेठेनगर, वैभव कॉलनी, जाखडीनगर असा भाग असून त्याला अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांच्या प्रभागातील चिंतामणी कॉलनी, श्रद्धा विहार कॉलनी, शिवकॉलनी, पांडवनगर परिसर आला आहे. वडाळा गावही त्याला जोडण्यात आले असून अशा स्थितीत ओबीसी व सर्वसाधारण अशा दोन महिला तर अनुसूचित जाती व सर्वसाधारण अशा दोन खुल्या जागा आहेत. सतीश सोनवणे आणि संजय चव्हाण या दोघांनाही हा प्रभाग सुरक्षित आहे. १मात्र, प्रभागात खुल्या प्रवर्गाची एकच जागा असून त्याठिकाणी संजय चव्हाण आणि सतीश सोनवणे दावेदार आहेत. सोनवणे सध्या भाजपात असल्याने त्यांची पक्षाकडे दावेदारी असली तरी संजय चव्हाण हेदेखील भाजपाच्या मार्गावर असून तसे झाल्यास उमेदवारीसाठी सोनवणे आणि चव्हाण यांच्यात स्पर्धा होणार आहे.२ याच भागात सध्याचा प्रभाग क्रमांक ५२ व ५२ मिळून प्रभाग क्रमांक ३१ हा सर्वात शेवटचा प्रभाग असून त्यात पाथर्डी गाव म्हणजेच सुदाम कोंबडे आणि वंदना बिरारी यांचा प्रभाग हा सतीश सोनवणे यांच्या प्रभागाला जोडला गेला आहे. परंतु या सोनवणे आणि थोरात यांनी नवा प्रभाग क्रमांक ३० मध्ये निवडणूक लढविल्यास आजमितीला सुदाम कोंबडे आणि वंदना बिरारी यांच्यासाठी हा प्रभाग सुरक्षित आहे.तीन पैकी दोन महिलाशहरातील दोनच प्रभाग तीन सदस्यीय असून त्यात प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. किनारा हॉटेल ते द्वारका, काठे गल्ली, शंकरनगर, गीताईनगर, भाभानगर असा भाग असून त्यात सद्यस्थितीत सचिन मराठे, अर्चना थोरात, वंदना शेवाळे व गुलजार कोकणी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रभागाचा सारडा सर्कलकडील भाग तुटला असल्याने हा प्रभाग छोटा आहे. या प्रभागात एक सर्वसाधारण व एक ओबीसी महिला असल्याने विद्यमान महिला नगरसेवकांना अडचण नाही; मात्र सर्वसाधारण असून या एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात चुरस असणार आहे. सचिन मराठे यांना मोठा कस लागणार आहे.