शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा योजनेपासून अनेकजण वंचित

By admin | Updated: October 28, 2015 23:02 IST

नांदूरशिंगोटे : यादीत नाव न आल्याने दीड वर्षापासून धान्य मिळत नसल्याची तक्रार

नांदूरशिंगोटे : पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दीड वर्षापासून अनेक लाभार्थींची नावे अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट होत नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्यासोबतच रॉकेलही मिळत नसल्याने पुरवठा विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दीड वर्षापासून रखडलेले यादीचे काम पूर्ण करून सणासुदीला तरी लाभार्थींना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी उपसरपंच ज्योती वाघचौरे यांच्यासह केशरी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे. येथे सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या दुकान क्रमांक ६१ मार्फत स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. येथे ९५३ केशरी, ८६ बीपीएल, तर १३२ अंत्योदय कार्डधारक आहेत. गतवर्षी फेबु्रवारी २०१४ मध्ये राज्यात अन्नसुरक्षा योजना लागू झाली. अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने निवडल्याने अनेक पात्र लाभार्थींना या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. अन्नसुरक्षा योजना सुरू होण्याआधी सर्व केशरी कार्डधारकांना गहू, तांदूळ मिळत होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून ग्रामीण भागात ७६.३२ इष्टांक गृहीत धरून ग्राहकांना लाभ द्यायचा होता. तथापि, येथील लाभधारकांच्या याद्या बनविताना इष्टांक गृहीत धरला नसल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या. १५ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामसभेचा ठरावही पुरवठा विभागाला दिला आहे. मात्र पुरवठा विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात येथे झालेल्या महाराजस्व अभियानांतर्गत झालेल्या विस्तारित समाधान दिनाच्या बैठकीतही याबाबतची तक्रार करण्यात आली. तथापि, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गेल्या दीड वर्षापासून केशरी कार्डधारक या योजनेपासून वंचित आहेत. सध्या एक हजार कार्डधारकांपैकी ५५० ते ६०० लोकांना लाभ मिळत आहेत. तीच परिस्थिती केरोसिनची आहे. पुरवठा विभागाकडून केशरी कार्ड दिले जाते; परंतु सदरच्या कार्डावर ग्रामीण भागातील नागरिकांना कोणताच लाभ मिळत नाही. केरोसिनचा पुरवठा कमी असल्याच्या कारणास्तव ते ग्राहकांना दिले जात नाही. दीड वर्षापासून कार्ड काढलेल्या लाभधारकांना केरोसिन नाही. त्यामुळे नांदूरशिंगोटे येथील केशरी कार्डधारकांना पुरेसा धान्य पुरवठा व केरोसिन मिळत नाही.ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन आहे त्यांचे रॉकेल वितरण बंद करण्यात आले आहे. काही ग्रामस्थांनी दीड वर्षापूर्वीच केशरी कार्ड काढले त्यांना अगोदरच रॉकेल मिळत नव्हते. ज्यांना मिळत होते त्यांचेही रॉकेल बंद झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन शिधापत्रिका दिल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यांत रेशन व रॉकेल सुरू होईल असे पुरवठा विभागाने सांगितले होते. तथापि, प्रत्यक्षात दीड वर्षापासून दोन्हीही गोष्टी ग्राहकांना मिळत नाहीत. याबाबत पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून येथील दिवाळी सणाच्या अगोदर केशरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी ज्योती वाघचौरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)