शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गिते कोट्यवधींचे धनी, पण कर्जबाजारी

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

उमेदवारांची मालमत्ता : खैरे, बोरस्तेही कोटींची धनी

नाशिक : मध्य नाशिकचे आमदार वसंत गिते हे कोट्यवधी रुपयांचे धनी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या इनोव्हा मोटारीसाठी काढलेले सव्वानऊ लाख रुपयांचे पतसंस्थेचे कर्ज फेडायचे आहे. दुसरीकडे शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि कॉँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे हेही कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीचे धनी आहेत. पैकी खैरेही कर्जबाजारी आहेत.मध्य नाशिक मतदारसंघातील आमदार वसंत गिते यांनी उमेदवारी अर्जासमवेत प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी गुंतवणूक आणि अन्य रक्कम, मोटार, सोनेनाणे धरून गिते यांच्याकडे अशी मालमत्ता १८ लाख ९५ हजार ९०५ रुपये मालमत्ता आहे, तर अन्य जमीन- जुमला, सदनिका यांचा विचार केला तर तीन कोटी ११ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तथापि, रविवार कारंजा सिद्धिविनायक को-आॅप. सोसायटीकडून त्यांनी इनोव्हा खरेदीसाठी कर्ज काढले होते. त्यापैकी नऊ लाख २८ हजार ६१९ रुपयांचे कर्ज फेडणे अद्याप बाकी आहे. याशिवाय गिते यांच्यावर नऊ गुन्हे दाखल असून, ते न्यायप्रविष्ट आहेत. कॉँग्रेस उमेदवार शाहू खैरे यांच्याकडील मालमत्ता तीन कोटी पाच लाख ५० हजार रुपये इतकी मालमत्ता दर्शविण्यात आली असून, त्यांंच्यावर एकूण ५२ लाख ५८ हजार १३७ रुपयांचे कर्ज आहे. शिवसेनेचे अजय बोरस्ते यांच्याकडे जंगम मालमत्ता ४२ लाख ३१ हजार ६२६ रुपये असून, स्वत: संपादन केलेली मालमत्ता दोन कोटी ९२ लाख ९१६ रुपये इतकी आहे. एकूण चार कोटी ७६ लाख रुपये मालमत्ता त्यांची व्यक्तिगत असून, वारसाप्राप्त मत्ता १६ लाख ५० हजार रूपये इतकी आहे. तथापि, त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. बोरस्ते यांच्यावर पाच गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. खैरे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. (प्रतिनिधी)