शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील अनेक गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:49 IST

मालेगाव : मालेगाव शहर व कॅम्प विभागातील अनेक गुन्हे नाशिक ग्रामीण व मालेगाव पोलीस दलाने गेल्या आठ-दहा दिवसांत उघडकीस आणले असून, दुचाकी चोरी, कुत्तागोळी, गावठी कट्टा बाळगणे, घरफोडी, तरुणीचा खून आदी विविध गुन्ह्यांतील आरोपींना गजाआड केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांची कामगिरी : विविध गुन्ह्यांतील आरोपी गजाआड

मालेगाव : मालेगाव शहर व कॅम्प विभागातील अनेक गुन्हे नाशिक ग्रामीण व मालेगाव पोलीस दलाने गेल्या आठ-दहा दिवसांत उघडकीस आणले असून, दुचाकी चोरी, कुत्तागोळी, गावठी कट्टा बाळगणे, घरफोडी, तरुणीचा खून आदी विविध गुन्ह्यांतील आरोपींना गजाआड केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील शहर पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत निलोत्पल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान आठ-दहा दिवसात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले. परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वांगडे आदी उपस्थित होते.दुचाकीचोरांना अटक१ आॅक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी दुचाकी चोरणाºया टिनुराज प्रदीप व्यवहारे (२१), रा. बसस्टॅँड जवळ, कुंदननगर ताहाराबाद, किरण हिराजी साळवे, रा. साळवे गल्ली, ताहाराबाद, पंकज निंबा बाविस्कर (३०), रा. ताहाराबाद या तिघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.