शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अनेक नागरिकांना लसीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

अद्याप बेडची प्रतीक्षा कायम नाशिक : शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊ लागला असला तरी अद्याप अनेक रुग्णांना बेड मिळणे ...

अद्याप बेडची प्रतीक्षा कायम

नाशिक : शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊ लागला असला तरी अद्याप अनेक रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. बहुतेक रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल असल्याने नव्या रुग्णांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपा रुग्णालयांचीही तीच स्थिती आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना सुट्या मिळणे कठीण

नाशिक : शहरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. येथील कर्मचाऱ्यांना सुटी मिळणेही मुश्कील झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या कामामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

बँकांमधील गर्दीवर परिणाम नाही

नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी शहरातील बँकांमधील गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक बँकांच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव आनखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजी विक्रेत्यांचे मास्ककडे दुर्लक्ष

नाशिक : भाजीविक्रेत्यांना सकाळी ११ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने सकाळच्या वेळी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. काही विक्रेते मास्क वापराकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अनेक मजूर झाले बेरोजगार

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी पर्यटकांनी पर्यटन स्थळांकडे पाठ फिरविल्यामुळे या परिसरातील छोटे- मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या अनेक मजुरांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

बेमोसमीमुळे शेतकऱ्यांची धावपळ

नाशिक : अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतित झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात कांदा काढणी व साठवणुकीची कामे सुरू आहेत. अचानक येणाऱ्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडते. काढून ठेवलेला कांदा भिजू नये यासाठी ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ऑनलाइनवर होतेय आंब्याची विक्री

नाशिक : कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविण्यासाठी उत्पादकांनी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांनी ऑनलाइन व्यवसाय सुरू केला असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील आंबा थेट घराघरात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची थेट विक्री

नाशिक : बंदमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी किरकोळ स्वरूपात भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे विविध मार्गांवर शेतकऱ्यांची भाजीपाल्याची दुकाने दिसून येतात. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.