शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी अनेकांनी बदलला पारंपरिक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:54 IST

येवला : कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत.

येवला : (योगेंद्र वाघ)  कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू झाली, त्यापाठोपाठ जिल्हाबंदी, गावबंदी. लॉकडाऊनमुळे जनजीवनच ठप्प झाले. बाजारपेठा ठप्प झाल्या, उद्योग-व्यवसाय बंद पडले. सर्वच जण घरात अडकडून पडले. अनेकजण बेरोजगार झाले. तीन महिन्यात स्वत:जवळील जमापुंजीही संपल्यानंतर अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे अनेकांनी पोटासाठी आपले पारंपरिक व्यवसाय सोडून दोन पैसे मिळवून देणारे लॉकडाऊन, संचारबंदी काळात चालणारे व्यवसाय सुरू केल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसून येत आहे.येवल्यात फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या अजय शेख या तरुणाने फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. अजय बारा ते तेरा वर्षांपासून तालुक्यात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. लग्नसराईत चार-पाच महिने फोटोग्राफी करायची व त्यातून मिळणाºया उत्पन्नातून वर्षभर घरप्रपंच चालायचा; परंतु कोरोनामुळे लग्नसराई सुरू होण्याआधीच फोटोग्राफी व्यवसाय लॉकझाला.वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फिरले. यामुळे कुटुंब चालवायचे कसे, प्रपंच सांभाळायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून अजयने रस्त्यावर फळ विक्र ी सुरू केली. अजयसारखेच काही फोटोग्राफर व्यवसायिकांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. योगेश भावसार हा तरुण बस स्टॅण्डवर पेपर विक्र ी करायचा. लॉकडाऊनमुळे बससेवा बंद झाली त्यामुळे प्रवासीही नाही.परिणामी योगेशने शहरात सायकलवर मटकी विक्र ीचा व्यवसाय सुरू केला.काही सायकलवर खारी-टोस्ट विकतात, तर काही शेंगदाणे-गुडदाणी विकत आहेत.पैठणी विणकर कारागीर वाल्मीक सासे यांच्या घरात दोन हातमाग आहेत. पैठणी उत्पादनातून ते आपले कुटुंब चालवतात. परंतु कोरोनाने ऐन लग्नसराईत बाजारपेठा ठप्प झाल्या. परिणामी व्यवसाय बंद पडला. कुटुंब चालवण्यासाठी त्यााने भाजीपाला विक्र ी व्यवसाय सुरू केला.--------------------शेतमालास दर नसल्याने शेतकरी हैराणकोरोना संसर्गाने शेती व्यवसायही प्रभावित झाला आहे. लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने शेतीमाल कवडीमोल किमतीत विकावा लागला तर अनेकांना फेकून द्यावा लागला. आधीच अडचणीत असलेला शेतकरी कोरोनाने आणखीनच अडचणीच्या खाईत लोटला गेला आहे.------------कर्ज फेडण्याचे आव्हानअनेक व्यवसायिकांनी बँका, पतसंस्था, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाच्या भीतीने ग्राहक दुकानापर्यंत येत नसल्याने व्यवसाय सुरू करूनही पैसे मिळतील याची शाश्वती नसल्याने व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.