शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:54 IST

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच  लांबली. शौचालय वापर प्रमाणपत्र आणि सातवीची शैक्षणिक अर्हता यामुळे अनेकाचे अर्ज बाद झाले.

ठळक मुद्देहालचाली गतिमान : माघारी होणार ४पर्यंत

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच लांबली. शौचालय वापर प्रमाणपत्र आणि सातवीची शैक्षणिक अर्हता यामुळे अनेकाचे अर्ज बाद झाले.दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने या मधल्या काळात अनेक राजकीय हालचाली होणार आहेत.      ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत  नाशिक तालुक्यात २९ तर बागलाण तालुक्यात ३० उमेदवारांचे अर्ज बाद झाले. इतर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरु होते. परंतु अनेक तालुक्यांमध्ये छाननी दरम्यान उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे आक्षेपामुळे काही ठिकाणी विलंब झाला. सायंकाळपर्यंत   येवला १३, दिंडोरी १७,  बागलाण  ३०, नाशिक २९ व देवळ्यात एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. सिन्नर, कळवण, निफाड,  चांदवड, मालेगाव, नांदगाव या तालुक्यातील अर्ज छाननीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. येत्या चार जानेवारीला अर्ज माघारी मुदत असून चिन्ह वाटप होणार आहे.प्रकिया अद्याप अपूर्णरात्री आठ वाजेपर्यंत दिंडोरी, बागलाण, देवळा आणि नाशिक तालुक्यातीलच अर्ज छाननीची प्रकिया पूर्ण होऊ शकली.  जिल्ह्यात १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी  १६ हजार ९९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  या अर्जांची छाननी प्रक्रिया गुरूवारी राबविण्यात आली.

टॅग्स :ElectionनिवडणूकGovernmentसरकार