शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मानोरी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

पाटोदा / मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, मुखेड आदी परिसराला बुधवारी (दि. ८) मध्यरात्री ...

पाटोदा / मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, मुखेड आदी परिसराला बुधवारी (दि. ८) मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले.

परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहात असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाची संततधार सुरू होती. मात्र, बुधवारी मध्यरात्री जोरदार विजांच्या गडगडाटासह पावसाचा वेग वाढून मुसळधार पाऊस बरसला. रात्रीची वेळ असल्याने शेतकऱ्यांना पाणी साचण्याचा कोणत्याही प्रकारचा अंदाज आला नव्हता. सकाळ झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणारे दुतर्फा नाले ओसंडून वाहात होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे लागवड केलेली पिके खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. काही ठिकाणी पिके काढणीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. मात्र, काही परिसरातील पिके काढणीला येण्यासाठी अजून वेळ आहे. काही शेतातील सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी आदी पिकांना सध्या पावसाची अत्यंत गरज होती. पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला असला तरी काही शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. संततधार झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचले असल्या कारणाने शेतातील पिके काहीशी खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

-------------------------

पेरण्या पूर्ण, तरीही पावसाची प्रतीक्षा

मानोरी परिसरात यंदा तब्बल महिनाभर उशिराने रिमझिम पावसाच्या भरोशावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या होऊनही येथील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून होती. यंदाच्या मोसमातील हा पहिल्यांदाच बरसलेला मुसळधार पाऊस असून, या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. मका, सोयाबीन, टोमॅटो आदी पिकांच्या शेतातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहिरी, बोअरवेल यांना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात आले आहे.

---------------

रस्ता जलमय

मानोरी गावालगत असलेला एक नाला मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहात होता. मानोरी बु. ते खडकीमाळ रस्त्यावरून या नाल्याचा प्रवाह प्रवाहीत झाल्यानंतर रस्ता जलमय झाला होता. या नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांचा मका, सोयाबीन, टोमॅटो आदी पिकातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असल्याने या पिकांचे नुकसान होण्याची धास्ती बळीराजाला निर्माण झाली आहे. (०८ मानोरी १/२/३)

080921\08nsk_10_08092021_13.jpg

०८ मानोरी २