शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोर मोकाट मनोज संसारे : मनमाड येथे जनआक्रोश महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:52 IST

मनमाड : कोरेगाव भीमा प्रकरणातील हल्लेखोर मोकाट असून, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.

ठळक मुद्देसभेत घणाघाती भाषण जनतेला भयभीत करण्याचा प्रकार

मनमाड : कोरेगाव भीमा प्रकरणातील हल्लेखोर मोकाट असून, निषेध करणारे मात्र कारागृहात असल्याने या सरकारला आंबेडकरी जनता जाब विचारणार असल्याचे सांगत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. मनमाड शहर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिक तसेच संविधान परिवार सामाजिक ऐक्य मंचतर्फे आयोजित जनआक्रोश महासभेतते बोलत होते. लॉँग मार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचेही या सभेत घणाघाती भाषण झाले. कार्यक्र माचे अध्यक्ष विनय गरु ड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळासाहेब जगताप यांनी प्रास्ताविकातून कार्यक्र माचा हेतू विशद केला. यावेळी संसारे म्हणाले की, सरकार विरोधात विधानसभेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच्या प्रचारार्थ आज मनमाड येथे पहिल्या सभेचा शुभारंभ करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला दहशत माजविण्यासाठी शासनपुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा आंबेडकरी जनतेला भयभीत करण्याचा प्रकार असून, देशभरात अहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे ते म्हणाले. प्रा. कवाडे यांनी सरकारविरोधात कडाडून टीका केली. भिडे एकबोटेंना अटक करण्याऐवजी सामाजिक न्यायाची घोषणा करणारे सरकार त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अर्जुन डांगळे, गणेश उन्हवणे, विवेक चव्हाण, शहराध्यक्ष संजय भालेराव, विनय गरुड, बाळासाहेब जगताप, अरुण धिवर, राजू गायकवाड, देवेंद्र आडसुळे, प्रकाश चिवरया, जगदीश आढाव, गंगाराम इंदिसे, सुनील कदम, भागवत मोरे, तौफीक खान, विजय पगारे, तुषार आहिरे, मुकेश थोरात यासह कार्यकर्ते उपस्थित होते.भरतीला विलंब नाशिक : वारंवार मागणी करूनही नाशिक महापालिका प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या नोकरभरतीला टाळाटाळ करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून, यासंबंधी मेहेतर व वाल्मीकी समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.