शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला मुद्रांक शुल्क अधिभारापोटी १२ कोटी

By admin | Updated: March 25, 2017 22:24 IST

नाशिक : महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांचे १२ कोटी ५९ लाख रुपये वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढले आहेत.

नाशिक : महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांचे १२ कोटी ५९ लाख रुपये वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढले आहेत. याच काळात नोटाबंदीचा फटका मुद्रांक विक्रीलाही बसल्याने महापालिकेच्या अनुदानात त्यामुळे सुमारे अडीच ते तीन कोटींनी घट झाली आहे.महापालिकेला राज्य शासनाकडून एलबीटी अनुदानाबरोबरच एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराचीही रक्कम दरमहा मिळत असते. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम प्राप्त झालेली नाही. मात्र, आता राज्य शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या काळातील एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी १२ कोटी ५९ लाख रुपये वितरित केले आहेत.  केंद्र सरकारने आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१६ याच काळात नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका मुद्रांक विक्रीवरही झाला होता. एरव्ही महापालिकेला मुद्रांक शुल्क अधिभारापोटी दरमहा सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपये उपलब्ध होतात, परंतु आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील केवळ १२ कोटी ५९ लाख रुपयेच हाती पडणार आहेत. त्यामुळे महापालिकेलाही सुमारे अडीच ते तीन कोटींचा फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)