मनमाड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मनमाड न्यायालयात महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याअदालतीमध्ये अनेक प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले.दीपप्रज्वलनाने अदालतीच्या कामकाजास सुुरुवात झाली. यावेळी मुुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, न्यायाधीश स्वाती फुलबांधे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे, सचिव किशोर चोरडिया, सुभाष डमरे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, मोहन माळवतकर, आनंदा पाटील आदी उपस्थित होते. रेल्वे, बॅँका, पतसंस्था, पालिका, महावितरण यासह दाखल असलेल्या व सध्या दिवाणी व फौजदारी न्यायप्रविष्ठ असलेली अनेक प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती. यामध्ये ११६ दावे निकाली काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झाला. अदालतीच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र पालवे, बी. एस. निकम, एम. जी बापट यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. किशोर चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.
मनमाडला राष्ट्रीय महालोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:09 IST