शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

मनमाडच्या खेळाडूला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:15 IST

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेद्वारा आयोजित आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन ताश्कंद येथे करण्यात आले असून, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेला येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद संतोष आहेर याने १८९ किलो वजन उचलून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.

मनमाड : आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेद्वारा आयोजित आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन ताश्कंद येथे करण्यात आले असून, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेला येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद संतोष आहेर याने १८९ किलो वजन उचलून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मुकुंदने आता आंतरराष्ट्रीय यूथ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावित चांगली मजल मारलीआहे़ शहरातील निकिता काळे नंतर मुकुंदने आंतरराष्ट्रीय आशियाई यूथ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला आहे. यशस्वी खेळाडूला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, एन.आय.एस. प्रशिक्षक तृप्ती पाराशर, जय भवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे यांचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच वेटलिफ्टिंग खेळाडू ठरला आहे. उझबेकिस्तानच्या खेळाडूची कडवी लढत मोडीत काढत मुकुंदने सुवर्णपदक पटकावले आहे.

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंगEducation Sectorशिक्षण क्षेत्र