शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड : शेतमाल विक्रीचे लाखोंचे धनादेश वटले नाहीत संतप्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:10 IST

मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी वर्गाकडून मिळत नसल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देउपोषणात असंख्य शेतकरी सहभागी झाले होतेअनेक वर्षात कधी नव्हे ते कांद्याला चांगला भाव मिळाला

मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी वर्गाकडून मिळत नसल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले. काही व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले लाखो रु पयांचे धनादेश न वटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात करण्यात आलेल्या उपोषणात असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.परप्रांतीय व्यापारी शेतकºयांना गंडा घालून शेतमालाचे पैसे बुडवत असल्याचे प्रकार नित्याचे असले तरी मनमाड येथील काही स्थानिक व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले ३२ लाख रुपयांचे चेक बाऊन्स झाले. व्यापाºयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षात कधी नव्हे ते कांद्याला चांगला भाव मिळाला असला तरी विकलेल्या मालाचे चेक बाऊन्स झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबाबत बाजार समितीचे संचालक व माजी आमदार संजय पवार यांनी बाजार समिती प्रशासन तसेच जिल्हा निबंधक यांना वारंवार तक्र ारी केल्या. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने काही व्यापाºयांचे परवाने रद्द करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेतकºयांचे पैसे तत्काळ मिळावे यासाठी पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात न आल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (बाजार समिती कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. उपोषणात जि. प. सदस्य आशाबाई जगताप, बाजार समिती संचालक अशोक पवार, राजू सांगळे, संजय अहेर, दीपक गोगड, मीराबाई गंधाक्षे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, राजेंद्र देशमुख, माजी जि. प. सदस्य राजाभाऊ पवार, अनंत अहेर, विठ्ठल अहेर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.