शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

मनमाडला घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: December 10, 2015 22:39 IST

मनमाडला घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

मालेगाव : मनमाड शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चार लाख २७ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.येवला, मनमाड, मालेगाव परिसरात घरफोड्या वाढल्याने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, अनिल ढुमसे, हवालदार राजेंद्र पाटील, रवींद्र वानखेडे, दीपक अहिरे, राजेंद्र लहारे, कैलास देशमुख आदि पोलिसांनी कारवाई करून आकाश अनिल अहिरे (२२) रा.शिवाजीनगर, दत्तमंदिराजवळ, मनमाड, अभिलाष दीपक बनकर (२०) रा. शिवाजीनगर, जयभवानी व्यायामशाळेजवळ मनमाड यांना अटक केली.त्यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने, पोती, मंगळसूत्र, कर्णफुले, टॉप्स, मुरण्या असा १४० ग्रॅम ५०० मिली वजनाचे ३ लाख ६४ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि घरफोडीतील भ्रमणध्वनी संच व रोख रक्कम ५९ हजार अशी एकूण चार लाख २७ हजार ३०० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक कडासने म्हणाले, नाशिक येथे बैठक घेऊन देवस्थानांच्या मालमत्तेविषयी घ्यावयाची काळजी, नेमायचे सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, शस्त्र आदिंबाबत मार्गदर्शन करण्यात आले.