मनमाड : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा उत्सवाला प्रारंभ झाला असून, संत ज्ञानोबांच्या जयघोषांने नेहरू भवन परिसरात प्रतिआळंदी अवतरल्याची अनुभूती येत आहे. शुक्रवारी पहाटे नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सवाला प्रारंभ झाला. अन्न महामंडळाचे प्रबंधक राकेश रंजन, प्रीती रंजन, नरेश गुजराथी, स्वाती गुजराथी, राजेंद्र गुप्ता, अंजली गुप्ता या निमंत्रित दांपत्यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली माउलींच्या प्रतिमेचे व पादुकांचे विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली.मनमाड येथील श्री दत्तोपासक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे ५३ वे वर्ष आहे. वसंतराव आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अभंग, विष्णू सहस्त्रनाम, सामुदायिक हरिपाठ होऊन पारायणाला सुरुवात झाली. या उत्सव सोहळ्यात रोज पहाटे काकड आरती, श्रींची पाद्यपूजा, अभिषेक, सनईवादन, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण, कीर्तन, सामुदायिक हरिपाठ, प्रवचन अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या जयघोषाने उत्सव स्थळाचा परिसर दणाणून गेला आहे. श्री ज्ञानेश्वरांची भव्य प्रतिमा, पादुका, भगवे ध्वज, रोेषणाई आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांमुळे मंगलमय वातावरण तयार झाले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या सोहळ्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे संयोजन श्री दत्तोपासक मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाठ, उपाध्यक्ष किरण कात्रे, सचिव सतीश जोशी, जयंत भूधर, प्रशांत जोशी, मधुकर भोळे, प्रकाश कुलकर्णी, नितीन जोशी, सुरेश वाघ, गणेश गरुड यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.
मनमाड : ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा अवतरली प्रतिआळंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:14 AM
शहरातील श्री संत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा उत्सवाला प्रारंभ झाला असून, संत ज्ञानोबांच्या जयघोषांने नेहरू भवन परिसरात प्रतिआळंदी अवतरल्याची अनुभूती येत आहे.
ठळक मुद्देमाउलींच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन सोहळ्याचे ५३ वे वर्ष पहाटे काकड आरती, श्रींची पाद्यपूजा