शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधून होणारी आंब्याची निर्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:51 IST

जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आंबा उत्पादकांना अनेक देशांमध्ये आंबे पाठविता आले नाहीत. ओझर येथील कार्गो विमानतळावरून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका । शेतकऱ्यांचे नुकसान

नाशिक : जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आंबा उत्पादकांना अनेक देशांमध्ये आंबे पाठविता आले नाहीत. ओझर येथील कार्गो विमानतळावरून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे.आंब्याचा हंगाम संपत आला तरी यावर्षी अमेरिकेत निर्यात सुरू झालेली नाही तर युरोपीय संघांमधील देशांमध्ये अवघा ५ ते ६ टन आंबा पाठविला गेला आहे. ओझर येथील कार्गो विमानतळावरून दरवर्षी अनेक देशांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. हंगाम सुरू झाल्यानंतर येथून दररोज किमान १० ते १५ टन आंबे निर्यात होत असतात युरोपमधील अनेक देशांमध्ये रत्नागिरी हापूस, दक्षिण भारतामधील बेगमपल्ली, कच्छमधील केशर आदी विविध प्रकारचा आंबा पाठविला जातो. परदेशात या आंब्याला भावही चांगला मिळत असतो.यावर्षी जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे अनेक देशात लॉखडाऊन असल्याने वाहतूक तसेच विमानसेवा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे आंबा निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. दरवर्षी हंगामात ५०० टनापेक्षा अधिक मालाची निर्यात होत असते. यावर्षी आतापर्यंत युरोपातील विविध देशांमध्ये केवळ ५ ते ६ टन आंबा निर्यात होऊ शकली आहे. सध्या अंब्याची जी काही निर्यात सुरू आहे ती मुंबई येथून होत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. कोरोनाने अनेक आंबा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा परकीय चलनाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आधीच मंदीमध्ये असलेली अर्थव्यवस्था आणखी कोलमडण्याची भीती आहे.अमेरिका, जपान येथील निरीक्षक दरवर्षी लासलगाव येथील विकिरण केंद्रात येऊन पाहणी करतात. त्यानंतर अमेरिकेत आंबा निर्यात सुरू होते. यावर्षी कोरोनामुळे हे निरीक्षक येऊ शकले नाहीत, यामुळे अमेरिकेत अद्याप आंबा निर्यात सुरू झालेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबा