शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आंबे दिंडोरी-मोहाडी रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:00 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडी रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे. ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.

ठळक मुद्देजानोरी : वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडी रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे. ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष वाघ, संदिप कड, गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.हा रस्ता दहा ते बारा वर्षापासून नादुरुस्त आहे. या रस्त्यावर एवढ्या वर्षात कधी डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्याकडे दिंडोरी पंचायत समितीच्या दळणवळन विभागाने कायमच कानाडोळा केला आहे. सदर रस्ता हा खेडगाव,बोपेगाव,जऊळके-वणी, मातेरेवाडी,लोखंडेवाडी,जोपुळ,खडक-सुकेना,कुर्नोली, कोराटे,मोहाडी अशा अनेक गावांना नाशिक येथील मुख्य बाजारपेठेला भाजीपाला घेऊन जाण्याचा जवळचा मार्ग आहे. सदरचा रस्ता हा सोयीस्कर असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात राहाते प्रवाशांना नाशिकला जाण्याचा जवळचा मार्ग आहे. हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा चालकांना झाडा-झुडपांंच्या आड असलेल्या वाहाचा अंदाज येत नाहीत्यामुळे छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे संबंधीत विभागाने तात्काळ रस्त्याची दूरुस्ती करावी, अन्यथा पंचक्रोशीतील शेतकरी व सर्व पक्षीयांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग