शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मांगीतुंगीचा ‘ब’ तीर्थस्थळ क्षेत्रात समावेश

By admin | Updated: December 11, 2015 23:45 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : शिखर समितीने सादर केलेल्या विकास आराखड्यास मंजुरी

नाशिक : मांगीतुंगी तीर्थस्थळाचा ‘ब’वर्ग तीर्थस्थळ क्षेत्रात समावेश करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, मांगीतुंगी शिखर समितीने सादर केलेला विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.११) नागपूर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मांगीतुंगी विकास राज्य शिखर समितीची बैठक झाली. बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार दीपिका चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच मांगीतुंगी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मांगीतुंगी विकास आराखड्यानुसार १२० दिवसांत ई-निविदा पद्धतीने कामे करण्याचा कालावधी कमी करण्यात यावा, तसेच अभिषेकासाठी उदवाहक (लिफ्ट)बाबत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, अशी चर्चा करण्यात आली. तसेच मांगीतुंगी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याने ही कामे तत्काळ सुरू करून नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे चुंबळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिर्डी तीर्थस्थळ क्षेत्राचा सुमारे २००० कोटींचा विकास आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. हा आराखडा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, केंद्र सरकारकडून या आराखड्यास किती निधीची उपलब्धता करून देण्यात येते, हे पाहून राज्य शासन त्यासाठी निधीची तरतूद करेल, तसेच संस्थानचे १४०० कोटींचे नियोजनही या आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या विकास आराखड्यानुसार अनेक विविध विकासकामे करण्यात येणार असून, त्यात प्रामुख्याने साईबाबा यांचे जीवनावरील संग्रहालय (म्युझियम) बनविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)