शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

मांगीतुंगीचा विकास कुंभमेळ्याच्या धर्तीवर

By admin | Updated: December 4, 2015 00:15 IST

खर्चात कपात : केंद्राऐवजी राज्य सरकार करणार कामे

नाशिक : फेब्रुवारीत बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी कराव्या लागणाऱ्या मांगीतुंगीच्या विकासाला केंद्र सरकारने निधी न दिल्याने आता ही जबाबदारी राज्य सरकारने उचलून खर्चात मोठी कपात करताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर कामे करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच भाग म्हणून सिंहस्थ कक्षाकडे त्याची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर असलेल्या भगवान ऋषभदेव महाराज यांच्या या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीयमंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मंत्र्यांबरोबरच विदेशातूनही लाखोंच्या संख्येने जैन धर्मीय सहभागी होणार आहेत. साधारणत: पाच ते सहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळ्याची व्याप्ती पाहता, त्यामानाने मांगीतुंगी येथे मूलभूत सोयी-सुविधांची अपूर्तता असल्याने चार महिन्यांपूर्वी एका खासगी सल्लागार संस्थेच्या वतीने मांगीतुंगी विकास आराखडा तयार करण्यात आला. साधारणत: २७५ कोटी रुपये खर्चाच्या या आराखड्यात मांगीतुंगीसाठी अनेक कायमस्वरूपी कामे सुचविण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने सदरचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता व केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने मांगीतुंगी तीर्थक्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु केंद्र सरकारने त्यास सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने तीन महिने सदरचा आराखडा तसाच पडून राहिला, परिणामी हाती फक्त दोन महिने शिल्लक असल्याने राज्य सरकारने घाईघाईत नोव्हेंबर महिन्यात यासंदर्भात बैठक घेऊन मांगीतुंगीच्या विकासाच्या ५५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देतानाच अनेक कामांना कात्री लावून तात्पुरत्या सोयी-सुविधांवर भर देणारी कामेच करण्याचे ठरविले आहे.पुतळा अनावरण सोहळ्यासाठी अवघे दोन महिने हाती असल्याने इतक्या कमी वेळेत मांगीतुंंगीत विकास कामे होण्याबाबत शासनालाच साशंकता वाटल्याने त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर कामे करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची जबाबदारीही कुंभमेळा कक्षाकडे सोपविली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून या कक्षाने मांगीतुंगी विकासाच्या कामांचे प्राधान्य ठरविण्याबरोबरच विविध यंत्रणांकडून अंदाजपत्र मागविण्यात सुरुवात केली आहे.