शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:33 IST

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन गजानन महाराज मंदिरासमोरून उज्ज्वला वेंकटेश व्यास (५१ रा.औरंगाबाद ) या पायी जात असतांना बुधवार (दि१७)रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ५४ हजार रुपये किंमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गळ्यातून ओरबाडून पळ काढल्याचे फिर्यादीत व्यास यांनी म्हटले आहे

ठळक मुद्दे ५४ हजार रुपये किंमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी व्यास या शहरात पाहुण्या

नाशिक : येथील गजानन महाराज मंदिराजवळून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा सोनसाखळी चोरी करणारे चोरटे सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात मोबाईल हिसकावून पळ काढणा-या दुचाकीचोरट्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन गजानन महाराज मंदिरासमोरून उज्ज्वला वेंकटेश व्यास (५१ रा.औरंगाबाद ) या पायी जात असतांना बुधवार (दि१७)रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ५४ हजार रुपये किंमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गळ्यातून ओरबाडून पळ काढल्याचे फिर्यादीत व्यास यांनी म्हटले आहे. व्यास या शहरात पाहुण्या आल्या असून त्यांची बहीण साधना गजानन चिक्षे (रा.गितांजली कॉलनी), यांच्या मुलाचा विवाह असल्याने त्या कुटुंबियांसमवेत आल्या. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास व्यास या बहीणीसोबत चप्पल खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी व्यास यांच्या गळ्यामधील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. यावेळी चोरटे हे जॉगींग ट्रॅकपासून अंतर्गत कॉलनी रस्त्याने चार्वाक चौकाकडे जात होते. दरम्यान, त्यांनी व्यास यांच्या समोरील दिशेने येऊ न गळ्यावर थाप मारत सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेसंदर्भात इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Robberyदरोडाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय