शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णाच्या पोटातून काढली तब्बल ७२ नाणी! सवय बेतली जीवावर : पालघर जिल्ह्यातील रुग्णावर नाशिकमध्ये शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:18 IST

‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़ १) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़

ठळक मुद्देचलनातील नाणी गिळण्याचीच सवयसुमारे साडेतीन तास शस्त्रक्रिया मद्याची सवय असलेला व मानसिक आजार

नाशिक : ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़ १) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण्यात आली़ या आजाराने ग्रस्त रुग्णास खडू, केस वा माती यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो; मात्र या रुग्णास चक्क लोखंड अर्थात चलनातील नाणी गिळण्याचीच सवय जडली होती़ डॉ़ अमित केले यांनी सुमारे साडेतीन तास शस्त्रक्रिया करून या रुग्णाच्या पोटातून एक, दोन, पाच व दहा रुपयांची ही ७२ नाणी बाहेर काढून रुग्णाला जीवदान दिले़पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील थोरातपाडा या आदिवासी पाड्यावर बेझॉर वा पायका मानसिक आजार झालेला पन्नासवर्षीय कृष्णा सोमल्या सांबर हा पत्नी व पाच मुलांसह राहतो़ मद्याची सवय असलेला व त्यातच मानसिक आजार असलेल्या कृष्णाला गत वीस वर्षांपासून लोखंडी वस्तू त्यातही पैसे गिळण्याची सवय जडली होती़ पोटातील नाण्यांचे मूल्य १६३ रुपये मानसिक आजार झालेल्या कृष्णा सांबर यांनी गिळलेल्या नाण्यांचे मूल्य १६३ रुपये आहे़ गिळलेल्या नाण्यांमध्ये दहा रुपयांची दोन, पाच रुपयांची १७, दोन रुपयांची २१, एक रुपयाची १४ व ५० पैशांची चार अशा नाण्यांचा समावेश आहे़ याबरोबरच पाच लोखंडी वायसर व एक नटही पोटातील जठरातून बाहेर काढण्यात आला आहे़ तरुणपणी गिळलेली काही नाणी गुदद्वारामार्फत बाहेर पडली, तर काही पोटातील जठराच्या आतील भागात अडकून पडली़ गत तीन वर्षांपासून सतत उलट्या व खाल्लेले अन्न पचत नसल्याने त्याने कल्याण तसेच काही खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, मात्र निदान झाले नाही़ पाणी व ज्यूस यावर गत तीन वर्षांपासून जगत असलेल्या कृष्णाची प्रकृती अत्यंत खराब झाल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या ओळखीतून त्यास कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ तेथील सर्जन व एण्डोस्कोपीतज्ज्ञ डॉ़ अमित केले यांनी प्रथम कृष्णाच्या पोटाचा एक्सरे काढला. त्यामध्ये जठराच्या आतील भागात केवळ एक धातूचा तुकडा असल्याचे दिसत होते़ त्यामुळे डॉक्टर केले यांनी एण्डोस्कोपीचा निर्णय घेतला. मात्र जठरामध्ये अन्न असल्याने प्रथम ते साफ करण्यात आले़ यानंतर एण्डोस्कोपीमध्ये कृष्णाच्या जठरामध्ये चलनातील नाणी असल्याचे दिसले़