शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आझाद महामंडळाचा व्यवस्थापक जाळ्यात

By admin | Updated: November 27, 2015 23:00 IST

शैक्षणिक कर्जासाठी अभिप्राय : १५ हजारांची मागणी

नाशिक : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडे शैक्षणिक कर्जासाठी केलेल्या अर्जावर अभिप्राय व फाईल मंजुरीला पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून दहा हजार रुपये घेणारे सहायक जिल्हा व्यवस्थापक प्रदीपकुमार इंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़२७) सापळा लावून रंगेहाथ पकडले़ त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तक्रारदाराचा मुलगा अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेतो आहे़ त्याच्या पुढील शिक्षणासाठी १ लाख ११ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी तक्रारदाराने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयाकडे आॅनलाइन अर्ज केला होता़ मात्र हे प्रकरण गत दोन महिन्यांपासून प्रलंबित होते़ या प्रकरणाची छाननी करून त्यावर अभिप्राय तसेच मुंबईला प्रमुख कार्यालयाकडे पाठविण्यासाठी सहायक जिल्हा व्यवस्थापक प्रदीपकुमार वैकुंठराव इंगळे यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ जिल्हा सहायक व्यवस्थापक इंगळे यांच्यासोबत झालेल्या तडजोडीनंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी सापळा लावण्यात आला़ आझाद विकास महामंडळाच्या कार्यालयात दुपारी एक वाजेच्या सुमारास इंगळे यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची रक्कम घेताच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)