शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराविना मनोमीलनाचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:47 IST

लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेषत: या मेळाव्यात अन्य पक्षातील काहींचे ‘इनकमिंग’ होण्याची चर्चा होती. त्यासंदर्भाने उत्तर महाराष्टÑातील मातब्बर राजकीय घराणे संपर्कात असल्याचे भाजपाकडून बोलले जात होते. कॉँग्रेस व राष्टÑवादीतून तिकीट न मिळालेल्यांची नावे त्यासाठी घेतली जात होती. पण तसेही काही न झाल्याने हा मेळावा उपचार ठरल्याची चर्चा खुद्द ‘युती’तच होऊ लागली आहे.युतीच्या उमेदवारांचा एकप्रकारे प्रचाराचा नारळ एकत्र फोडण्याचा संदेश या मनोमीलन मेळाव्याद्वारे देण्यात आल्याने उत्तर महाराष्टÑातील झाडून सारे मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली. एवढेच नव्हे तर सेना वा भाजपा अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून नुकतेच पक्षांतर केलेल्या व काही पक्षांतराच्या वाटेवर असलेल्या इच्छुकांनीदेखील या मेळाव्यात आवर्जून हजेरी लावली. त्यांच्या हजेरीमुळे विद्यमान खासदारांना धडकी भरणे साहजिकच होते. विद्यमान खासदारांनी यापूर्वीच आपापल्यापरीने पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना त्यात अन्य इच्छुकांची भर पडल्यामुळे दोन्ही पक्षात राजी-नाराजीचे वातावरण असून, अशा परिस्थितीत युतीने मनोमीलनासाठी महामेळाव्याचे आयोजन केल्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अपेक्षित होती. तशी आशा बाळगूनच उत्तर महाराष्टÑाच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. परंतु ‘सेनेची जागा सेना लढवेल, भाजपाच्या जागेवर भाजपा’ एवढेच जाहीर करण्यात आल्यामुळे युतीच्या जागा वाटपात फेरबदल होणार नाही असे स्पष्ट झाले. शिवाय विरोधकांकडे उमेदवार नाहीत, अशी टीका एकीकडे करीत असताना मग स्वपक्षाकडे उमेदवारीसाठी जर इच्छुक मोठ्या प्रमाणात असतील तर युतीने मेळाव्यातच उमेदवार का जाहीर केले नाहीत, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.... तर मनातील जळमटे दूर झाली असतीया मेळाव्यात विरोधी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होण्याची व्यक्त होणारी शक्यताही फोल ठरली असून, जर दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर करून मनोमीलन मेळावा घेतला असता तर एकमेकांच्या मनातील जळमटे दूर झाली असती, असेही आता बोलले जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा