शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

औंदाणेत गाळेवाटपात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:03 IST

सटाणा : नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश सटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात बोगस लाभार्थी दाखवून गैव्यवहार केल्याप्रकरणी बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गाळे सील करून दि. १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश ग्रामसेवकाला दिले आहेत.

सटाणा : नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश

सटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात बोगस लाभार्थी दाखवून गैव्यवहार केल्याप्रकरणी बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गाळे सील करून दि. १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश ग्रामसेवकाला दिले आहेत.  माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी उपोषण केल्यानंतर झालेल्या चौकशीअंती हा आदेश देण्यात आला. दरम्यान, बोगस लाभार्थी दाखवून काही सदस्यांनी कुटुंबासाठी गाळ्यांचा लाभ घेतल्याने त्यांना आगामी आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दि. ३१ मे २००९ व दि. २ आॅक्टोबर २०१० च्या ग्रामसभेत अनुक्रमे ९४ व ४५ ग्रामस्थांची उपस्थिती होती. या अल्प उपस्थितीमुळे गणपूर्तीचा अभाव असतानादेखील ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे बांधकामाचा ठराव करताना गरजू व अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी गाळे बांधण्याच्या ठरावाला मंजुरी दिली. या गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबरोबरच नव्याने गाळे वाटप करावेत या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी उपोषण केले होते. याची बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी चौकशीअंती गाळ्यांना सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर औंदाणे येथे ग्रामसभा घेऊन योग्य लाभार्थींची निवड करावी आणि तो अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या गैरव्यवहारात औंदाणे ग्रामपंचायतीचे काही आजी-माजी सदस्य अडकण्याची शक्यता असून, स्वत: व कुटुंबाच्या लाभासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे चौकशीदरम्यान आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या सदस्यांना निवडणूक लढविण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या योजनेचा प्रस्ताव सादर करताना अम्मा भगवान महिला बचत गट, यशवंत महिला बचत गट, सप्तशृंगी महिला बचतगट यांना कागदोपत्री गाळे वितरित करण्यात आले आहेत. परंतु या लाभार्थींनी जादा भाडेपट्ट्याने दुसºया व्यावसायिकांना गाळे दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत आहेग़्रामपंचायतीला नाममात्र भाडे औंदाणे ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया यशवंतनगर येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत सन २०१०-११ मध्ये व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गाळे वाटप करताना लाभार्थींची निवड ही बांधकामाचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच झाले असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे वाटप करताना जी कारणे कागदोपत्री दाखवली आहेत त्यापैकी कोणताही लाभार्थी या गाळ्यांमध्ये स्वत: व्यवसाय करीत नसून दुसºया व्यावसायिकांना जादा भाडे आकारून दिले होते. ग्रामपंचायतीला मात्र नाममात्र भाडे दिले गेले .