शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाजाची राजकीय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:34 IST

फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले असून, मंत्रिमंडळात माळी समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नाशिक : फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले असून, मंत्रिमंडळात माळी समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.नाशिक जिल्हा माळी समाज नियोजन समितीतर्फे एक दिवस समाजासाठी, एक दिवस भविष्यासाठी एक दिवस अस्तित्वासाठी ही त्रिसूत्रीसमोर ठेवून द्वारका परिसरातील माळी मंगल कार्यालयात माळी समाज चिंतन आणि स्नेहमेळाव्यात ते रविवारी (दि. २९) बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सुनील मोरे, बाजीराव तिडके, अविनाश ठाकरे, दीपक मंडलिक, सुनीता गिते, अनिल जाधव, चंद्रकांत बागुल, अविनाश ठाकरे, आदी उपस्थित होते. संभाजी बोरुडे म्हणाले, संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा समृद्ध वारसा माळी समाजास लाभला आहे. समाजात साक्षरतेचा प्रसार करण्यात आणि सामाजिक, राजकीय योगदानात मोलाची भूमिका बजावणाºया माळी समाजात एकजुटीची भावना, वैचारिक प्रगती व्हावी आणि समाज विधायक उपक्र म राबविण्यासाठी आपसातील मतभेद दूर करून समाजाने संघटित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, तर सामाजाच्या प्रगतीच्या नवनवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत संभाजी पगारे यांनी व्यक्त केली.  यावेळी चर्चासत्रात सद्यस्थितीला समाज व्यवस्थेमध्ये माळी समाजाचे स्थान, माळी समाजाचे स्वरूप, समाजबांधवांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध वाटा, माळी समाजापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने यांसारख्या विविध महत्त्वाच्या पैलूंसह ‘राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील माळी समाजाचे स्थान आदी विषयांवर समाजबांधवांनी त्यांची मते मांडली. दरम्यान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले रचित विविध गीतांचा आविष्कारही यावेळी सादर करण्यात आला. यावेळी राज्यभरातून माळी समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मोहन माळी यांनी केले. राका माळी यांनी आभार मानले.छगन भुजबळांची पाठराखणमाळी समाज चिंतन, स्नेहमेळाव्यात माळी समाजाकडून माजी मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण करीत त्यांच्यावर राजकीय व सामाजिक द्वेशातूनच कारवाई होत असल्याचा दावा करण्यात आला. यापूर्वीही शहरात माळी समाजाने अनेक बैठका घेऊन भुजबळांना पाठिंबा दिला आहे.