शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी एकाच दिवशी १४ कोरोनाबाधित; अहवाल येण्यापुर्वीच दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 22:25 IST

नाशिक : मालेगाव येथील १४ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर यातील २ जणांचा अहवाल येण्यापुर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यातील एकाचा १३एप्रिल तर अन्य बाधिताचा शुक्रवार (दि.१७) रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या चार झाली आहे.

नाशिक : मालेगाव येथील १४ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर यातील २ जणांचा अहवाल येण्यापुर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यातील एकाचा १३एप्रिल तर अन्य बाधिताचा शुक्रवार (दि.१७) रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या चार झाली आहे.  जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेदिवस वाढतच आहे. शुक्रवारी एकाच दिवसात १४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासन हादरले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मालेगावसह आता सत्तरवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेऊन अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागेवर धनंजय निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवडाभरापासून रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने मुंबई, पुण्यापाठोपाठ जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाच्या बाबतीत ‘हॉटस्पॉट’ ठरू पाहात आहे. जिल्ह्यात गुरूवारी नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाही तोच शुक्रवारी (दि.१७) मालेगाव येथीलच आणखी १४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ७० च्यावर पोहोचल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मालेगावच्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात कुठेही घट येत नसल्याने मालेगावातील लागण कशी रोखावी, हाच प्रशासनापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :Nashikनाशिक