शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचा ओम ठरला यंदाचा ‘क्लासिकल व्हॉइस आॅफ इंडिया’

By admin | Updated: December 16, 2015 23:43 IST

मालेगावचा ओम ठरला यंदाचा ‘क्लासिकल व्हॉइस आॅफ इंडिया’

मालेगाव : येथील रावळगाव नाका भागात राहणारा ओम कचेश्वर बोंगाणे हा यंदाच्या ‘क्लासिकल व्हॉइस आॅफ इंडिया’चा मानकरी ठरला आहे. लखनौ येथे शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही स्पर्धा संगीत मीलन संस्था व संगीत रिसर्च अकॅडमीतर्फे दरवर्षी घेतली जाते. त्यासाठी प्रथम राज्यपातळीवर स्पर्धा घेण्यात येऊन त्यातील विजेत्यांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येते. यंदा १६ ठिकाणी राज्यपातळीवरील स्पर्धा झाली. शास्त्रीय संगीतावर आधारित या स्पर्धेत मुंबईत राज्यपातळीवर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात राज्यातून चाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात ओम पहिला आल्याने त्याची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तेव्हा त्याला व्हॉइस आॅफ मुंबई हा पुरस्कार देण्यात आला. ही स्पर्धा लखनौ येथे झाली. यासाठी १२ राज्यातून ६४ स्पर्धक निवडण्यात आले होते. तीन दिवसांच्या या स्पर्धेत ओमने वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी लखनौ येथील संगीत नाटक अकाडमीच्या संत गाडगे महाराज सभागृहात झाले. यावेळी खासदार डिंपल यादव, लखनौ स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक गौतम सेनगुप्ता, किशोर बाबू, सुरेंद्र जैयस्वाल आदि प्रमुख पाहुणे होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या ओमने मागील वर्षीही या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने त्याचे व्हॉइस आॅफ इंडियाचा मानकरी होण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र त्याने यंदा पुन्हा जोरदार तयारीने या स्पर्धेत भाग घेत या पुरस्कारावर नाव कोरले.