शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचा मोसमपूल बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी सोयगाव : मालेगावचा मोसम पूल मृत्यूचा सापळा बनला असून पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत ...

त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी

सोयगाव : मालेगावचा मोसम पूल मृत्यूचा सापळा बनला असून पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघाला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.

शहरातील जवळपास अडीच लाख लोकांचा रोजचा वापर या पुलावरून होतो. तालुक्यातील ४० ते ४५ खेड्यातील लोक व जळगांव, धुळे, नंदूरबार, शहादा, इंदोर, गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे जाणाऱ्या येणाऱ्या बसेस मोसम पुलाचा वापर करतात. मालेगाव मध्यकडे, बस स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात ह्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना ह्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पुलावरून जातांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार व रिक्षाचालक तर जेरीस आले आहेत. म.न.पा. कधी जागी होईल असा सवाल विचारला जात आहे. पुलावरून जातांना खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा तोल जाऊन खाली खोल नदीत पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन-तीन महिन्यांपासून खड्ड्यांची संख्या वाढली असून मालेगांव मनपाचे अद्यापपर्यंत ह्या समस्येकडे लक्ष वेधलेले नाही. वाहनचालक जीवानिशी गेल्यास पालिका जागी होईल का? शहरातील सर्वात जुना आणि सततची रहदारी असलेला पूल वाहनचालकांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे.

कोट...

पुलाची अवस्था बिकट झाली असून स्टॅण्ड ते देवीच्या मळ्यापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करावी लागत असल्याने पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास बऱ्याच जणांना जडला आहे. वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मनपाने लवकरात लवकर रस्ता व पूल दुरुस्त करावा.

- प्रदीप अहिरे, शिक्षक, मालेगाव