नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा सोमवारी (दि़ १७) सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ कमळाबाई कौतिक पाटील (६५) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, ती मालेगाव तालुक्यातील वजिरखेडे येथील रहिवासी आहे़ दरम्यान, जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे २९ जणांचा मृत्यू झाला असून, एप्रिलमधील हा चौथा बळी आहे़मालेगाव येथील खासगी रुग्णालयात कमलाबाई पाटील यांच्यावर उपचार सुरू होते़ मात्र प्रकृती खालावत चालल्याने शुक्रवारी (ता.१४) मुंबई नाक्यावरील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ त्यांचा खासगी रुग्णालयातील अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे़ दरम्यान, सोमवारी (दि़१७) दुपारी त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये चार रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये तीन महिला व एक पुरुष आहे़ या चौघांचेही अहवाल प्राप्त झालेले नाहीत़, तर पाटील यांचा स्वॅब पुणे येथे पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ जिल्ह्णात स्वाइन फ्ल्यूने आतापर्यंत २९ बळी घेतले असून, त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात नऊ, तर खासगी रुग्णालयांमध्ये २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे़(प्रतिनिधी)
मालेगावच्या वृद्धेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By admin | Updated: April 18, 2017 01:39 IST