नाशिक : विधानसभा निवडणूक तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथील सराईत गुन्हेगार मोहमंद इब्राहिम अब्दुल रहिम यास सहा महिन्यांसाठी नाशिक जिल्'ातून तडीपार करण्यात आले आहे़ मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील तक्कलनगर भागात राहणारा सराईत गुन्हेगार मोहमंद इब्राहिम रहिम याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत़ रहिमची मालेगावमधील सामान्य लोकांमध्ये दहशत असून, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते़ या पार्श्वभूमीवर मालेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी रहिमच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ या प्रस्तावानुसार नाशिक उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी २० सप्टेंबरपासून सहा महिन्याच्या कालावधीसाठी नाशिक जिल्'ातून तडीपार केले आहे़ (प्रतिनिधी)
मालेगावचा सराईत गुन्हेगार मोहंमद रहिम तडीपार
By admin | Updated: September 28, 2014 00:51 IST