शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: December 3, 2015 22:07 IST

मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात

मालेगाव : शहरातील डास मच्छरांचे साम्राज्य वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत असून महापालिकेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी भाजपातर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन पोफळे यांनी पत्रकान्वये दिली. पत्रकात म्हटले आहे की, शहरात कचऱ्याचे साम्राज्य वाढले असून गटारींमध्ये प्लॅस्टिक जमा होऊन गटारी तुंबल्या आहेत. काही ठिकाणी सांडपाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. मोसम नदीच्या वाढत्या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात विविध साथींनी थैमान घातले असून डेंग्यू, टाइफाइड, मलेरियासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील नागरिक नियमितपणे मनपाचे कर भरत असताना त्यांना महापालिकेतर्फे सुविधा पुरविण्यात येत नाहीत. महापालिकेकडे शहर स्वच्छता व औषध फवारणीसाठी पैसे नसल्याने भाजपातर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर हरिप्रसाद गुप्ता, दीपक गायकवाड, शरद अहिरे, सुनीता कुलकर्णी, कुसूम बच्छाव, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष शाहीदखान इस्माईलखान, मदन गायकवाड, नीलेश कचवे, प्रल्हाद शर्मा आदि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)पर्समधून ५४ हजारांचा ऐवज लांबविलानाशिक : मोबाइलवर बोलणाऱ्या महिलेच्या पर्समधून दोघा चोरट्यांनी ५४ हजारांचा ऐवज चोरून नेला. सिन्नर फाटा खर्जुलनगर येथील गजानन पार्क येथे राहणाऱ्या स्नेहल गोरडिया (३०) या आपल्या बहिणीसह मंगळवारी सायंकाळी दुचाकीवर (एमएच १५, डीटी १२४८) नाशिक-पुणे महामार्गे नाशिकरोडकडे येत होत्या. स्नेहल गोरडिया यांच्या बहिणीचा फोन आला असता त्यांनी नेहरूनगर येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाइलवर बोलत होत्या. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी स्नेहल गोरडिया यांच्या पर्समधील ४ हजार रुपये रोख व ५० हजारांचे दागिने व काही कागदपत्रे असा सुमारे ५४ हजारांचा ऐवज नजर चुकवून हातोहात चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)