शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : नोंदणी एक लाख मजुरांची; प्रत्यक्षात कामावर १६ हजार मजूर मजुरांअभावी रोजगार हमी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:09 IST

मालेगाव : तालुक्यात शासनाची रोजगार हमी योजना मजुरांअभावी रखडली आहे. सुमारे ५७ हजार ५७२ कुटुंबांतील एक लाख मजुरांची नोंदणी झाली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जातेरोहयोच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली

मालेगाव : तालुक्यात शासनाची रोजगार हमी योजना मजुरांअभावी रखडली आहे. सुमारे ५७ हजार ५७२ कुटुंबांतील एक लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र नोंदणीकृत मजुरांपैकी केवळ १६ हजार ३९ मजूरच रोहयोच्या कामावर येत असल्याचे समोर आले आहे.मालेगाव पंचायत समिती व महसूल विभागातर्फे तालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावे, मजुरांचे कामामुळे होणारे स्थलांतर थांबावे, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र तालुक्यात ही योजना मजुरांअभावी रखडली आहे. या योजनेंतर्गत विहिरी, रस्ते, घरकुले, मातीनाला बांध, भूमिगत बंधारा, साठवण बंधारा, वृक्षलागवड, रोपवाटिका, वनतलाव आदी कामे केली जातात. या कामांसाठी येणाऱ्या मजुरांना प्रतिदिन २०१ रुपये वेतन दिले जाते. असे असताना रोहयोच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. केवळ कागदावरच मजुरांचा आकडा फुगवला गेला आहे. प्रत्यक्षात कामावर मजूर उपलब्ध होताना दिसत नाहीत. रोहयो योजनेंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये तालुक्यात २७४ विहिरी, २३ रस्ते, साडेतीन हजार घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. एका घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत मजुरांना ६ कोटी ८१ लाख १३ हजार रुपये मजुरीपोटी वाटप करण्यात आले आहेत, तर विहीर कामापोटी ६७ लाख ९७ हजार रुपयांची मजुरी अदा करण्यात आली आहे. गेल्या १ एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेबाबत तालुक्यात मजुरांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मालेगाव पंचायत समिती व महसूल विभागातर्फे तालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावे, मजुरांचे कामाअभावी होणारे स्थलांतर थांबावे, मजुरांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र मालेगाव तालुक्यात ही योजना मजुरांअभावी रखडल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१८ पासून नवीन रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यानुसार तालुक्यात कामे निश्चित केली जाणार आहेत. मात्र कागदोपत्री मजुरांची संख्या दिसून येते; प्रत्यक्षात मजुरीला मजूरच येत नसल्याचे वास्तव आहे.