शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पासपोर्टप्रकरणी मालेगाव मनपा कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:48 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशियतांना मंगळवारी न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालेगाव मध्य : बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशियतांना मंगळवारी न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बांगलादेशी नागरिकास जन्मदाखला बनविण्यासाठी मदत करणार्या मनपाच्या कर्मचार्यांला मनपा आयुक्त दीपक कासार यांनी बडतर्फ केले आहे. मनपा कर्मचारी ललित मराठे यास आयेशानगर पोलिसांनी गुरु वारी रात्री अटक केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले होते.बांगलादेशातून घुसखोरी करून शहरात अवैधरितीने वास्तव्य करून बनावट दस्तावेजाच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक करणार्या व त्यांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिकासह सात जणांना गुरु वारी रोजी अटक केली होती. त्यांना शुक्र वारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने व सोमवारी सायंकाळी एका मनपा कर्मचार्यासह जन्मदाखला बनविण्यासाठी मदत करणारा असे दोन जणांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सर्व संशियतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.बोगस दाखले बनविल्याचा संशयपोलिसांनी आलम अमिन अन्सारी याच्या ताब्यातून त्याचा जन्मदाखला जप्त करण्यात आला होता. तो जन्मदाखला प्रभाग कार्यालय क्र मांक ? मधील जन्म-मृत्यू विभागात तत्कालीन संगणकचालक मानधन कर्मचारी व सद्य:स्थितीतील गॅरेज विभागातील मानधन वाहनचालक ललित नाना मराठे याने बोगस दाखले बनविले असल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवArrestअटक