शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मालेगाव  मनपाचे ४१२ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:18 IST

मालेगाव : मनपाच्या स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकावर दीर्घकाळ चर्चा करीत किरकोळ फेरबदलाचे अधिकार महापौरांना देत व नगरसेवक निधीची तरतूद करीत १५ कोटींची वाढ अपेक्षित धरीत सुमारे ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला महासभेने मंजुरी दिली. या अंदाजपत्रकाच्या मंजुरीमुळे शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.महापौर रशीद ...

मालेगाव : मनपाच्या स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकावर दीर्घकाळ चर्चा करीत किरकोळ फेरबदलाचे अधिकार महापौरांना देत व नगरसेवक निधीची तरतूद करीत १५ कोटींची वाढ अपेक्षित धरीत सुमारे ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला महासभेने मंजुरी दिली. या अंदाजपत्रकाच्या मंजुरीमुळे शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलविण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी मुख्य लेखाधिकारी कमरुद्दीन शेख यांनी २०१८-१९च्या अंदाजपत्रकातील महापालिका दर व कर, विशेष अधिनियम वसुली, शिक्षण, भांडवली जमा, सर्वसाधारण कर, शाळा इमारत भाडे, मोबाइल मनोरे, किरकोळ जागा भाडे, व्यापारी संकुलांचे भाडे, खासगी दवाखान्यांची नोंदणी शुल्क आदी लेखाशीर्षकांचे वाचन केले.  यावेळी महापालिकेची मालमत्ता करवसुली शंभर टक्के होत नाही यामुळे नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याची मागणी केली. यावर मनपा आयुक्त धायगुडे यांनी येत्या एप्रिल महिन्यात कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जातील, असे सांगितले. रुग्णालय नोंदणी शुल्कवाढीचा विषय चर्चेला आला. शहरात केवळ ८४ रुग्णालयांनी नोंदणी केली असल्याचे डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक भीमा भडांगे यांनी शहरात दोनशेहून अधिक रुग्णालय सुरू आहेत. त्यांच्याकडूनही नोंदणी शुल्क आकारा असे सांगितले. यावर डॉ. डांगे यांनी संबंधित रुग्णालय संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. भाजपाचे नगरसेवक सुनील गायकवाड यांनी शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीचा विस्तार करण्याची मागणी करत या कामासाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्याची मागणी केली. यानंतर महापौरांना अंदाजपत्रकात किरकोळ फेरबदलाचे अधिकार देण्यात आले आहेत.  तसेच नगरसेवकांना चार लाख रुपये निधी व विकासकामांसाठी १६ लाख असे २० लाख रुपये निधींची तरतूद केली आहे. तसेच अंदाज-पत्रकात सुमारे १५ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित धरत ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली आहे.  अंदाजपत्रकाच्या चर्चेत शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर, डॉ. खालीद परवेज, अतिक कमाल, बुलंद एकबाल, एजाज बेग, शान-ए-हिंद, अस्लम अन्सारी, ताहेरा शेख आदींनी भाग घेतला.स्थायी समितीने सुचविली करवाढगेल्या ७ मार्च रोजी महापालिका प्रशासनाने ३८२ कोटी ६३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. या अंदाजपत्रकावर १२ मार्च रोजी स्थायी समितीची बैठक झाली. स्थायी समितीने १५ कोटी ६२ लाख ३० हजार रुपयांची वाढ सुचवित ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. सोमवारी या अंदाजपत्रकावर महासभेत चर्चा करण्यात येऊन सुमारे ४१२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMalegaonमालेगांव