मालेगाव : शहरातील रसुलपुरा, खैबान निशात चौक, चंदनपुरी गेट आदी भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याने जात असलेल्या लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. या हल्ल्यात १३ बालके जखमी झाले आहेत. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. दहा ते पंधरा कुत्र्यांचा कळप रस्त्यावर फिरत असून, लहान मुलांना लक्ष्य केले जात आहे.या हल्ल्यात फारूक अहमद जाकीर अहमद या बालकाच्या डोक्याला कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.त्याला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मालेगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १३ बालके जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:29 IST