शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांसह आबालवृद्धांची गर्दी ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:08 IST

मालेगाव : रमजान सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना मुस्लिम बांधवांच्ी शहरातील किदवाई रस्त्यावर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून सायंकाळच्यावेळी गर्दीने बाजारपेठ फुलून जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील मुस्लीम बांधव रमजानच्या खरेदीसाठी येतातलहान मुलांचीही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

ंमालेगाव : रमजान सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना मुस्लिम बांधवांच्ी शहरातील किदवाई रस्त्यावर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून सायंकाळच्यावेळी गर्दीने बाजारपेठ फुलून जात आहे. शहरातील किदवाई रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत महिलांसह आबालवृद्धांची वर्दळ वाढली आहे. यंत्रमाग व्यवसायावर आलेली मंदीचा परिणाम या सणाच्या खरेदीवर काहीअंशी जाणवत आहे. बहुतांश ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव रमजानच्या खरेदीसाठी मालेगावी येतात. त्यात बागलाण, नांदगाव, मनमाड, चांदवड, देवळा भागातील मुस्लीम वर्गाचा समावेश असतो.गेल्या महिनाभरापासून रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. शहरातील किदवाई रस्ता, मोहंमद अली रस्ता, कुसूंबा रस्ता, अंजुमन चौक, बापू गांधी मार्केट, आझादनगर मार्केट, सोनिया गांधी मार्केट आदी ठिकाणी बाजारात गर्दी होत आहे. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत महिला पुरुषांपासून लहान मुलांचीही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाल्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. आयशानगरातील बाजारपेठेत रात्रीच्या वेळेत खरेदीसाठी झुंबड होत आहे. शहरात असलेल्या महिलांच्या बाजारात रात्री आठनंतर महिला खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत.रमजानच्या पार्श्वभूमीवर लुंगी, टोप्या, हातरुमाल, स्त्री- पुरुष- लहान मुले आदींचे तयार कपडे, पादत्राणे, शिरखुर्म्यासाठी लागणारे शेवया व सुकामेवासहित विविध खाद्यपदार्थांचे साहित्य, विविध प्रकारचे सुंगधी अत्तर, चष्मे आणि लहान मुलांची खेळणी आदी वस्तुंनी दुकाने थाटण्यात आली आहेत. रमजानचा रोजा सोडण्यासाठी लागणाऱ्या नानसह, शेवया, विविध खाद्यपदार्थांची रोज दुपारी खरेदी केली जाते. रमजानची नमाज पठण केले जाते. वाढत्या महागाईसोबत या वस्तुंच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. ठिकठिकाणी असलेल्या मशिदींमध्ये नमाजसाठी गर्दी होत असून मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.