मालेगाव : रमाई घरकुल योजना पारदर्शकपणे राबविण्यात यावी यासह अन्यविविध मागण्यांसाठी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मनपा स्वच्छता विभागात कंत्राटीपद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कामगारांना सध्या दिल्या जाणार्या ११0 ते १५0 रुपये प्रतीरोज ऐवजी २६0 रुपये रोज देण्यात यावा, मनपाने ठेकापद्धत बंद करून कायम नोकरभरती करावी, हजारखोली भागातील डॉ. आंबेडकर उद्यानाची दुरुस्ती करण्यात यावी, कालीकुट्टी येथील स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, मनपा हद्दवाढीतील दरेगाव येथील इंदिरा आवास घरकुल योजनेतील ४२ मंजूर घरकुलांचा धनादेश मिळण्यात यावा आदि विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मनपा प्रवेशद्वार येथे मनपाचे अभियंता कैलास बच्छाव यांनी मोर्चेकर्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी दीपक निकम, शांताराम सोनवणे, दादाजी महाले, खंडू उशिरे, शक्ती सौदे, साईनाथ निकम, राजू पवार, मंगेश निकम आदि उपस्थित होते.
मालेगाव मनपावर मोर्चा
By admin | Updated: August 28, 2014 01:13 IST