शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:02 IST

आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या सहकार्यामुळेच हगणदारीमुक्त शहर व करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन मनपाच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.

ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरीबद्दल अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार

आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या सहकार्यामुळेच हगणदारीमुक्त शहर व करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन मनपाच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.येथील महानगरपालिकेत हगणदारीमुक्त शहर, करवसुली, घरकुल योजना व अग्निशमन दलातर्फे करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर सखाराम घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आसीफ शेख, स्थायी समिती सभापती जयप्रकाश पाटील, नगरसेवक नीलेश आहेर, राजाराम जाधव, भिमा भडांगे, उपायुक्त नितीन कापडणीस आदि उपस्थित होते.यावेळी आमदार आसीफ शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त नितीन कापडणीस यांचीही भाषणे झाली. यावेळी हगणदारी मुक्त शहरासाठी योगदान देणारे राजू खैरनार, उमेश सोनवणे, गोकुळ बिरारी, कर वसुलीसाठी लेखाधिकारी कमरूद्दीन शेख, सचिन मार्तंड, कुंदन घुसर, प्रभाग अधिकारी अनिल पारखे, पंकज सोनवणे, किशोर गिडगे, शाम बुरकुल, घरकुल योजनेबाबत शहर अभियंता कैलास बच्छाव, सचिन माळवाड, अग्निशमन दलाचे संजय पवार यांच्यासह कर्मचाºयांना स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.मालेगाव शहर हगणदारीमुक्त करणे मोठे आव्हान होते. परंतु मनुष्यबळ कमी असूनही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या अपार मेहनतीमुळेच हे शक्य झाले व त्यास केंद्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले. आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर कर वसुलीचे उद्दिष्ट गाठून मनपाच्या तिजोरीत भर पडली. वर्षानुवर्षे रखडलेली घरकुल योजना पूर्णत्वास नेण्यात यश आले. यामुळे अनेकदा अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडाले. परंतु त्यापलीकडे जात सर्वांचा सहयोग व सहभाग मिळाल्यानेच आज शहरास काही दिले असल्याचे समाधान लाभले.- संगीता धायगुडे, माजी आयुक्त, मालेगाव मनपा