शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

मालेगाव मनपाने वसुलीसाठी दोन गाळ्यांना लावले सील

By admin | Updated: November 24, 2015 21:52 IST

मालेगाव मनपाने वसुलीसाठी दोन गाळ्यांना लावले सील

मालेगाव : येथील महानगरपालिकेने थकीत कर वसुलीधारकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पथकाने आज चार ठिकाणी कारवाई करत दोन गाळ्यांना सील लावले, तर दोन थकबाकीदारांकडून सुमारे पावणेदोन लाखाची वसुली केली आहे. येथील मनपाची शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे विविध करांची थकबाकी आहे. त्यात मनपा आर्थिक संकटात सापडलेली असल्याने आयुक्तांच्या आदेशाने थकबाकीदार व्यावसायिकांविरोधात उपआयुक्त कमरुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त शमसुद्दीन शेख, कर अधीक्षक शकील सय्यद, लिपिक रमाकांत धामणे, किरण पगारे, जयवंत पाटील व दिलीप मोरे यांच्या पथकाने शहरात चार ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत दोन गाळेधारकांकडून एक लाख ७० हजार ८३६ रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली, तर कुसुंबा रस्ता व सोमवार बाजार येथे प्रत्येकी एक गाळ्याला सील लावण्यात आले. यात कुसुंबा रस्त्यावरील सर्व्हे नंबर ४४ मधील क्रमांक ६ नंबरचा गाळा व कॅम्प भागातील सोमवार बाजार येथील १ नंबरचा गाळा यांचा समावेश आहे. यातील कुसुंबा रस्त्यावरील गाळामालक शेख अनु शेख युसुफ यांच्याकडे ७३ हजार २२८ रुपये, तर सोमवार बाजारातील म. स. ग्राहक संघाचे व्यवस्थापक यांच्याकडे १ लाख २० हजार ३८६ रुपये करांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)